‘ईव्हीएम’ डेटा नष्ट करू नका : सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “सध्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) मधून कोणताही डेटा नष्ट करू नये, असे आदेश न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. तसेच निवडणुकीनंतर ईव्हीएमची पडताळणी करण्याच्या याचिकेवर निवडणूक आयोगाने (ECI) १५ दिवसांच्या आत उत्तर दाखल करावे, असेही निर्देश दिले आहेत.
निवडणूक निकालांवर शंका असल्यास ईव्हीएमची पडताळणी करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर), हरियाणा काँग्रेस नेते सर्व मित्तल, करण सिंग दलाल यांनी याचिका दाखल केली होती. जनहित याचिकांवर सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने सुनावणी झाली.
सुनावणीदरम्यान वकील प्रशांत भूषण यांनी युक्तीवाद केला की, “सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार निवडणूक आयोगाने स्वीकारलेली प्रक्रिया त्यांच्या मानक कार्यपद्धतीशी सुसंगत असावी अशी आमची मागणी आहे. कोणीतरी ईव्हीएमच्या सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरची तपासणी करावी.सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरमध्ये काही फेरफार आहे की नाही हे पाहावे. यावेळी सरन्यायाधीश खन्ना यांनी विचारले, “एकदा मतमोजणी झाली की, पेपर ट्रेल तिथे असेल की बाहेर काढला जाईल?” “त्यांनी ईव्हीएम देखील जतन करायचे आहेत, पेपर ट्रेल तिथे असायला हवा,” भूषण म्हणाले. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर, न्यायालयाने आपल्या मागील आदेशाचे स्पष्टीकरण दिले आणि म्हटले, “आम्हाला असे नको होते की मोजणी होईपर्यंत कोणताही गोंधळ झाला आहे (मागील आदेशाद्वारे).आम्हाला पाहायचे होते की कोणाला काही शंका आहे का. आम्हाला असे हवे होते की कदाचित अभियांत्रिकी सांगू शकेल की काही छेडछाड झाली आहे का…” असे स्पष्ट करत खंडपीठाने निवडणूक आयोगाला पुढील १५ दिवसांत याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….