पैनगंगा अभयारण्यात दारू पिऊन वनपालाचा धिंगाणा ; वनरक्षक मारहाण केल्याप्रकरणी वनपालावर गुन्हा दाखल
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
स्वप्नील चिकाटे : ९९७०५३५९८८
ढाणकी :
पैनगंगा अभयारण्य बिटरगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत कार्यरत असलेले वनपाल ए व्ही गिरी यांनी दारूच्या नशेत वनरक्षकांना शिवीगाळ व अपमानीत करून मारझोड केल्याप्रकरणी बिटरगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पैनगंगा अभयारण्य पांढरकवडा वन्यजीव विभाग अंतर्गत बिटरगाव वनपरिक्षेत्र कार्यरत असलेले वनपाल गिरी यांनी दारू पिऊन नशेत व जेवणाच्या कारणावरून वनरक्षक फुलोरे यांना शिवीगाळ व अपमान , वरिष्ठ पदाचा गैरवापर करून तुच्छ वागणूक देत दारूच्या नशेत वनपाल ए व्ही गिरी यांनी वनरक्षक त्यांच्यासोबत वाद निर्माण करून मारहाण करण्यात आली त्यासंदर्भात वनरक्षक फुलोरे यांच्या लेखी तक्रारीनुसार बिटरगाव पोलीस स्टेशन मध्ये वनपाल गिरी यांच्या विरोधात 323, 506. (अदखलपात्र) गुन्हा नोंद करण्यात आला .
जखमी वनपाल छायाचित्र
वनपाल गिरी यांच्याविरुद्ध परिसरात अनेक तक्रारी आहेत व ते नेहमी दारूच्या नशेत राहतात यासंदर्भात पैनगंगा अभयारण्य वन्यजीव वन विभागीय अधिकारी पांढरकवडा यांच्याकडे फोनद्वारे तक्रारी दिल्या तरीपण वनपाल गिरी कोणाचच ऐकत नाही व विभागात मनमानी करत असल्याचा आरोप काही वन विभागाचे वन कर्मचारी नेहमीच वरिष्ठांना सांगत असतात असतात. काही राजकारणी व अवैध वृक्षतोड करणाऱ्या लोकांशी त्यांचे संपर्क वाढत चालल्याचा आरोप त्यांचे कर्मचारी करत आहेत हिवा वरिष्ठांना माहिती असून वरिष्ठ त्यांच्यावर कोणतीच कारवाई करत नसल्याचा आरोप परिसरातील नागरिक करत आहेत
वनपाल गिरी यांच्यावर पुढील कारवाई बिटरगाव पोलीस ठाणेदार विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन खरात ,जमादार हनवते व जारंडे हे तपास करीत आहे.