आज जिल्ह्यात कोरोनाचे 20 नवीन रुग्ण एक महिलेचा मृत्यू ; सर्वाधिक 18 दिग्रस मध्ये तर झरीजामणीत 2

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ
आज जिल्ह्यात एकूण 20 नवे कोरोना रुग्ण आढळले असून उमरखेड तालुक्यातील खरुस मधील एका महिलेचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक18 रुग्ण दिग्रस शहरातील असूनआज दिग्रस ला रुग्ण मोठ्या संख्येने आढळले आहेत.
उमरखेड तालुक्यातील खरुस येथील 68 वर्षीय महिलेचा यवतमाळात उपचारादरम्यान मृत्यू झाला या महिलेचा पती चाही मंगळवारी घरी मृत्यू झाला होता त्यामुळे आता प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली असून खरुस या गावात पोहोचली आहे. जिल्ह्यात एकूण बारा तालुक्यांमध्ये कोरोना चे जाळे पसरले असून चार तालुक्यात अद्याप कोरोना रुग्ण नाहीत. आज मिळालेल्या अहवालानुसार वीस जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले .दिग्रस तालुक्यात काही दिवसांपासून कोरोना संसर्गाचे रुग्ण कमी होत असल्याचे आशादायक चित्र असतानाच आज मात्र 18 रुग्ण वाढल्याने प्रशासनावर ताण येत आहे. अगोदरच 31 जुलै पर्यंत तालुक्यात लॉक डाऊन जाहीर केलेला आहे. कोरोना ची साखळी तोडण्याचे आशादायक चित्र असताना अचानक दिग्रस मध्ये अठरा रुग्ण सापडले त्यामुळे प्रशासनाच्या यंत्रणेची कसरत होत आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस नवीन कोरोना रुग्ण वाढत असल्याने जिल्हा प्रशासनावर ताण येत आहे.