फुलसिंग नाईक महाविद्यालयातील गणित विभागाच्या पी.एच.डी गाईड तथा प्राध्यापिका डॉ. प्रियंका बा. गायकवाड -खाडे यांना या वर्षातील सलग दुसऱ्यांदा गणित विषयाच्या राष्ट्रीय परिषदेतील सर्वोत्तम संशोधन सादरीकरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- आदर्श सायन्स, जे. बी आर्ट्स अँड बिर्ला कॉमर्स महाविद्यालय, धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती द्वारे दि. 8 फेब्रुवारी 2025 रोजी “विज्ञानातील सीमांचे अनुसंधान: सहकार्य, नवकल्पना आणि शाश्वतता यांचा वेध” या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषद.” आयोजित करण्यात आली.
या एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेमध्ये डॉ. प्रियंका बाळासाहेब गायकवाड-खाडे यांनी
“थर्मो इलास्टिक ऍनालिसिस ऑफ सिलेंडर अंडर आरबीटरी थर्मल लोडिंग युजिंग द
जनरलाइजड हँकल ट्रान्सफॉर्म”
या विषयावरती त्यांनी देशभरातील विज्ञान क्षेत्रातील विविध तज्ञ यांच्या उपस्थिती संशोधनात्मक शोध निबंध सादर केला असता उत्कृष्ट सादरीकरणासाठी अभ्यासपूर्ण संशोधन, प्रभावी संवादकौशल्य आणि सादरीकरणातील नवनवीन दृष्टिकोन यांचा विचार करून प्राध्यापिका डॉ. प्रियंका गायकवाड “बेस्ट ओरल प्रेझेंटेशन” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे फॅकल्टी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी,डीन डॉ. एच. आर देशमुख तसेच सी.डी.सी अमरावती चे चेअरमन श्री. प्रदीप कुमार लुनावत, फार्मर प्रोफेसर आणि गणित विभाग प्रमुख अमरावती विद्यापीठ, अमरावती चे डॉ. के. एस. आढाव , प्रोफेसर आणि गणित विभाग प्रमुख, बिट्स पिलानी, हैदराबाद येथील डॉ. बियुदत्ता मिश्रा तसेच हायर एज्युकेशन अमरावती विभागाचे जे. डी डॉ. के. पी. तुपे आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार देण्यात आला. हे राष्ट्रीय परिषद आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य तथा संयोजक डॉ. सुधीर बयास्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. डॉ. प्रियंका गायकवाड त्यांच्या या यशाबद्दल सर्व मान्यवरांनी अभिनंदन केले असून, हा सन्मान संशोधनाच्या क्षेत्रात अधिक प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. त्याबद्दल जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय जयभाऊ नाईक, महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. प्रल्हाद वावरे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद आदीने अभिनंदन केले.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….