दिल्लीत ‘आप’ला मोठा धक्का! अरविंद केजरीवाल १२०० मतांनी पराभूत…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “दिल्लीत भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपाने आम आदमी पक्षाच्या १२ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावला आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपा ४८ जागांवर आघाडीवर आहे, तर आम आदमी पक्ष २२ जागांवर आघाडीवर आहे.
यानुसार दिल्लीत भाजपाची सत्ता येणार हे निश्चित आहे. अशातच आता आम आदमी पक्षाचे नेते तथा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचाही पराभव झाला आहे. आपसाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे.
नवी दिल्ली मतदारसंघातून अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. भाजपच्या परवेश वर्मा यांनी १२०० मतांनी अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला आहे. या पराभवानंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांनाही उधाण आलं आहे. संदीप दीक्षित यांच्यामुळेच केजरीवाल यांचा पराभव केल्याचे राजकीय विश्लेषक सांगत आहेत. संदीप दीक्षित यांनी ३ हजारांपेक्षा जास्त मते या मतदारसंघात घेतली आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या आधी अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राज्याची धुरा आतिशी यांच्याकडे सोपवण्यात आली होती. अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा निवडणुकीआधी स्वत:ला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणूनही घोषित केले होते, आता त्यांचा पराभव झाला आहे.
याशिवाय आप नेते मनिष सिसोदिया यांचाही पराभव झाला आहे. भाजपचे उमेदवार तरविंदर सिंग मारवाह यांनी त्याचा पराभव केला. मनिष सिसोदिया यांना एकूण ३४ हजार ६० मतं मिळाली. तर भाजपाचे सिंग यांना ३४ हजार ६६६ मतं मिळाली. या पराभवावर बोलताना, मी ६०६ मतांनी पराभूत झालो आहे. जे जिंकले आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो. काय घडलं त्याबाबत आत्मपरीक्षण करु अशी प्रतिक्रिया मनिष सिसोदियांनी यांनी दिली.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….