दिल्लीत बाजी भाजपची, पण चर्चा मात्र अजित पवारांच्या 23 उमेदवारांची, कारण काय?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत आपच्या दहा वर्षाच्या सत्तेला खिंडार पाडले. भाजप सत्ता स्थापन करणार आहे. तर आम आदमी पक्षाला विरोधी पक्षात बसावं लागणार आहे. ही निवडणूक जरी भाजप आणि आम आदमी पार्टीच्या भोवती फिरत राहीली.
असं असलं तरी निकालानंतर चर्चा होती ती अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या 23 उमेदवारांची. ही चर्चा होण्याचे कारण या उमेदवारांच्या पदरात पडलेली मतं होती. विशेष म्हणजे या निकालानंतर अजित पवारांनी भाजपचं अभिनंदन केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसवर ताबा मिळवल्यानंतर अजित पवारांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रा बाहेर लढवली गेलेली ही पहिली निवडणूक होती. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्लीत आपले 23 उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्यातील एकाही उमेदवाराला विजय सोडा साधं आपलं डिपॉझिटही वाचवता आलं नाही. 23 पैकी 23 उमेदवारांचे डिपॉझिट गुल झाले. यातील काही उमेदवारांना 100 मतं ही मिळाली नाहीत. तर काहींना 50 मतांचा आकडाही गाठता आला नाही.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….