भारतीय कम्युनिस्ट पक्ष व आयटक च्या वतीने स्मार्ट विद्युत मीटर विरोधात निवेदन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- स्मार्ट प्रिपेड विद्युत मीटर ला संपूर्ण राज्य भरात सर्वच स्तरातून विरोध होत असतानाही स्मार्ट प्रिपेड मीटर बसविण्याची प्रक्रिया विजवितरण महामंडळ तर्फे राबविण्यात येत आहे. मोबाईल प्रमाणे रिचार्ज करा व वीज वापरा अशी सुविधा या मीटर द्वारे देण्यात येणार आहे. आजच्या युगात वीज मानवाची मूलभूत गरज झाली आहे. प्रिपेड मीटर मधील रिचार्ज संपला तर पुरवठा खंडित होईल व वीज अभावी नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागेल. तसेच कंत्राटी कामगारांना बेरोजगारी ला सामोरे जावे लागेल. यामुळे सदर स्मार्ट मीटर प्रक्रियेला जनतेचा प्रचंड विरोध आहे त्याच अनुषंगाने भारतीय कम्युनिस्ट पक्ष व पक्षाशी संलग्न आयटक, तसेच विजवितरण चे कंत्राटी कामगार संघटना यांनी संयुक्तिक उपविभागीय अधिकारी पुसद यांना निवेदन देऊन विरोध दर्शविला आहे. व पुसद मध्ये स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया बंद करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
यावेळी पक्षाचे तालुका सचिव अमोल गवरशेट्टीवार व आयटक चे तालुका सचिव डॉ. खुर्शीद वजुद यांच्यासह कंत्राटी कामगार संघटनेचे गजानन वाकोडे, सुरेंद्र कांबळे, दिलीप राठोड, सुभाष अटक , गजानन सोडगीर, वामन चोपडे, दत्तप्रभु पौळ, महेश मंदाडे, गजानन चौधरी, भास्कर बन्सोड, ज्ञानेश्वर मोरे, शुभम भरकाड, नंदलाल राठोड, संदीप करे, ऋषभ अडकीने, किशोर वायकुळे, प्रदीप ढोबळे, ज्ञानेश्वर पवार, राहुल मारकड, माणिक पवार, गजानन भरगाडे, निलेश आडे व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….