‘या’ लाडक्या बहिणींचा लाभ आता बंद; अंगणवाडी सेविका करणार चारचाकी वाहन असलेल्यांची पडताळणी, योजनेचे काय आहेत निकष?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- ” एवढ्या मोठ्या प्रमाणावरील महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न खरोखरच अडीच लाखांपेक्षा कमी आहे का?
यातील कोणाडेच चारचाकी वाहन नाही का? या प्रश्नांची उत्तरे शासन स्तरावरून शोधली जाणार आहेत. त्यासाठी राज्यस्तरावरून चारचाकी वाहने ज्यांच्याकडे आहेत, त्याची जिल्हानिहाय यादी पाठवून त्यात लाडकी बहीण योजनेतील किती लाभार्थी आहेत, याची सरसकट पडताळणी केली जाणार आहे.
सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय व अकलूज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडील (आरटीओ) आकडेवारीनुसार जिल्ह्यात २० लाखांवर वाहने आहेत. त्यात तीन लाखांहून अधिक वाहने चार, सहा, आठ-दहा चाकी आहेत. या तीन लाख वाहनधारकांपैकी किती कुटुंबातील (आधारकार्डवरील पती व वडिलांच्या नावावरुन) महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत, याची आता पडताळणी सुरू होणार आहे.
प्रारंभी राज्यस्तरावरून प्राप्त वाहनधारकांच्या यादीत लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी किती हे फिल्टर केले जाईल. त्यानंतर ज्यांच्या नावात किंवा इंग्रजी अक्षरात चूक राहिल्याने ऑनलाइन यादीत नावे दिसणार नाहीत, त्यांची पडताळणी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन केली जाणार आहे. शासनाने योजनेसंदर्भात काढलेल्या शासन निर्णयातील निकषांनुसार पात्र नसताना देखील ज्यांनी अर्ज केले, त्यांचा लाभ बंद करण्यासाठी ही पडताळणी होत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची स्थिती
जिल्ह्यातील एकूण महिला मतदार
१८.७६ लाख
एकूण लाभार्थी
११,०९,४८७
प्रत्येक महिन्यासाठी निधी
१६६.४२ कोटी
जिल्ह्यातील चारचाकीधारक
३ लाख
अंगणवाडी सेविका करतील वाहन असल्याची पडताळणी
राज्य स्तरावरून जिल्ह्यातील चारचाकी वाहनधारकांची यादी आम्हाला प्राप्त होईल. ती यादी आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींची नावे पडताळून पाहिली जातील. ज्यांच्या नावात किंवा स्पेलिंगमध्ये चूक असल्याने पडताळणी होणार नाही, अशा लाभार्थींकडील वाहनांची माहिती अंगणवाडी सेविका त्यांच्या घरोघरी जाऊन पडताळून पाहतील.
– प्रसाद मिरकले, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर
योजनेच्या निकषांनुसार पात्र असलेल्यांचा लाभ राहील कायम
सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या, पण निकषांनुसार पात्र नसलेल्यांना योजनेचा लाभ नाकारण्याचा ऑनलाइन पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आतापर्यंत जवळपास १५ महिलांनी लाभ नको म्हणून अर्ज केले आहेत. आता योजनेच्या निकषांनुसार ज्यांच्याकडे चारचाकी वाहन नाही, अशांनाच लाभ मिळेल.
– रमेश काटकर, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी, सोलापूर
कोणाकडे कोणत्या प्रकारचे वाहन आहे, हे लगेचच समजते
राज्यातील प्रत्येक वाहनधारकांची माहिती केंद्रस्तरावर तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्याची माहिती स्वतंत्रपणे ‘एनआयसी’कडे उपलब्ध असते. त्यात कोणाकडे चारचाकी वाहने आहेत, त्याची माहिती असते. वाहनाचा क्रमांक किंवा नाव ऑनलाइन टाकल्यानंतर कोणाकडे कोणत्या प्रकारचे वाहन आहे, हे लगेचच समजते.
– गजानन नेरपगार, प्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर
लाडकी बहीण योजनेचे निकष…
विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, निराधार महिला व कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला
किमान वयाची १८ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६५ वर्षे पूर्ण होईपर्यंत
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे
– कुटुंबाकडे चारचाकी वाहन नको, कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत नसावा, प्राप्तीकर भरणारा नसावा
संजय गांधी निराधार योजनेसारख्या वैयक्तिक लाभाच्या योजनेचा लाभ घेत असलेला नसावा

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….