GBS संसर्गजन्य रोग नाही मात्र याबाबत काळजी घेणं महत्त्वाचं – अजित पवार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “शहरात आणि जिल्ह्यात गुईवेल बॅलेन्स सिंड्रोमचे 22 संशयित रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी आयसीएमआरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी (एनआयव्ही) येथे पाठवण्यात आले आहेत.
या दुर्मिळ आजाराबाबत पुणे महानगरपालिका आणि आरोग्य विभाग दक्षता बाळगत आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मांजरी येथे बोलतांना गुईवेल बॅलेन्स सिंड्रोम या आजाराबाबत भाष्य केले. ते म्हणाले,’ GBS सिंड्रोम या आजाराचा आढावा घेतला हा संसर्गजन्य रोग नाही. याबाबत पुणे जिल्ह्यातील कलेक्टर, सीईओ आणि आधिकार्यांना सूचना देण्यात आल्या आहे. याबाबत काळजी घेणं महत्त्वाचं आहे. याबाबत नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण पाहायला मिळत आहे. जी संख्या ३० होती ती आत्ता ५९ वर गेली आहे. बहुतेक लोक हे पुण्यातील विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.”
दरम्यान, आरोग्य प्रमुख नीना बोराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आजाराचे रुग्ण पुणे शहरातील 6 आणि उर्वरित जिल्ह्यातील आहेत. हे रुग्ण उपचारासाठी पुण्यात दाखल झाले असून, हा आजार संसर्गजन्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
गुईवेल बॅलेन्स सिंड्रोम म्हणजे काय?
हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे, जो एक लाख लोकांपैकी एका व्यक्तीत आढळतो. वेगवेगळ्या प्रकारच्या लस घेतल्यानंतर किंवा एच1एन1 लस घेतल्यानंतर काही प्रकरणांमध्ये हा आजार होऊ शकतो. याचे निदान करण्यासाठी स्पायनल फ्लूडची चाचणी केली जाते. उपचारासाठी प्लाझ्मा एक्सचेंजसारख्या पद्धतींचा वापर केला जातो. हा आजार दुर्मिळ असला तरी घाबरण्यासारखा नाही, असे तज्ज्ञ सांगतात.
महापालिका आणि आरोग्य विभागाची कारवाई
एनआयव्हीकडून रिपोर्ट आल्यानंतर ज्या भागात रुग्ण आढळले आहेत, त्या ठिकाणी आरोग्य विभागाच्या टीम दाखल होणार आहेत. तसेच, ज्या हॉस्पिटलमध्ये हे रुग्ण उपचार घेत होते, त्या परिसरातील इतर रुग्णांचीही तपासणी केली जाणार आहे. महापालिकेने या रुग्णांची सखोल तपासणी सुरू केली असून, नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे सांगितले आहे. या दुर्मिळ आजारावर उपचार उपलब्ध असून, तो संसर्गजन्य नाही, हे विशेष आहे.