“लोक तुमच्यावर चपलांचा वर्षाव करतील…”; असदुद्दीन ओवेसी अरविंद केजरीवालांवर एवढे का भडकले?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचाराचा पारा सातत्याने वर-वर जाताना दिसत आहे. येथे दोन जागांवर निवडणूक लढवत असलेल्या ऑल इंडिया मजली-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनने (एआयएमआयएम) आपली संपूर्ण शक्ती पणाला लावली आहे.
एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी गुरुवारी रात्री ओखला येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर थेट निशाणा साधला. तसेच, त्यांना ओखलाच्या रस्त्यावरून फिरण्याचे आव्हान देत, लोक त्यांच्यावर चपला फेकतील, असे म्हटले आहे.
असदुद्दीन ओवेसी हे ओखला मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या दिल्ली दंगलीतील आरोपी शिफा-उर-रहमान यांच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी ओखलातील वाईट स्थितीवरून केजरीवाल यांच्यावर थेट हल्ला चढवला. ते म्हणाले, आपण येथील रस्त्यांची वाईट अवस्था बघितली. अरविंद केजरीवाल यांनीही बघावी. केजरीवाल १० वर्षांपासून मुख्यमंत्री आहेत, सर्वत्र विकास होत आहे. मग येथे विकास का झाला नाही? असा सवालही ओवेसी यांनी यावेळी केला.
ओवेसी पुढे म्हणाले, “आज मी येथील रस्त्यांवर फिरलो, आण १० मिनिटे चालून दाखवा. माझ्यावर फुलांचा वर्षाव झाला, येथील लोक तुमच्यावर चपलांचा वर्षाव करतील. येथे प्रचंड खड्डे आहेत, घाण आहे आणि ना साफसफाईची कोणतीही व्यवस्था आहे. १० वर्षांपासून बाजा वाजवत आहेत.”
“आम आदमी पक्षाचे नेते, भाजप जिंकेल, अशी भीती लोकांन दाखवत आहेत. मात्र, ओखलातून सातत्याने अल्पसंख्याक उमेदवारच जिंकत आला आहे आणि यावेळी शिफाच विजयी होतील. ओखलाची व्होटर लिस्ट मी तुमच्या तोंडावर फेकून सांगतो की, येथून शिपच जिंकेल. तुम्ही, भाजप जिंके अशी भीती दाखवू नका. माला माहीत आहे की, तुमच्याच मनात भिती निर्माण झाली आहे,” असेही ओवेसी या वेळी म्हणाले..

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….