महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? दावोसमधून उदय सामंतांचा मोठा दावा; म्हणाले, ’15 दिवसांत…’
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवणारी बातमी समोर येत आहे. शिवसेनेचे नेते उदय सामंत हे दावोस दौऱ्यावर आहेत. तिथूनच त्यांनी एक मोठा दावा केला आहे.
शिवसेना ठाकरे पक्षाचे 4 आमदार आणि 3 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटले आहेत तसेच काँग्रेसचे 5 आमदारही एकनाथ शिंदेंना भेटून गेल्याचा दावा उदय सामंतांनी केला आहे.
उदय सामंत हे सध्या दावोसच्या दौऱ्यावर असून त्यांनी दोन मोठ्या घडामोडींची माहिती त्यांनी दिली आहे. दावोसमध्ये पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात ५ लाख कोटींची गुंतवणूक नोंदवली आहे. त्यापुढे बोलताना ते म्हणाले की, लवकरच राज्यात राजकीय भूकंप होणार आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचे चार आमदार आणि तीन खासदारांनी मागील 15 दिवसांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. काँग्रेसचे 5 आमदार शिंदेंना भेटून गेलेत, असा दावा सामंतांनी केला आहे.
येत्या तीन महिन्यांत ठाकरे पक्षाचे १० माजी आमदार, काही जिल्हाप्रमुख तसेच काँग्रेसचे काही माजी आमदार-खासदार आणि पदाधिकारी शिवसेनेत सामील होतील अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. UBT आणि काँग्रेस फुटणार असून येत्या तीन महिन्यात अनेक आमदार आणि महत्वाचे नेते एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्विकारणार, असल्याचे सामंतांनी म्हटलं आहे.
दावोसमध्ये झालेले सामंज्यस करार
दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे काल रात्री उदघाटन झाल्यानंतर आज पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात विक्रमी 4 लाख 99 हजार 321 कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले आहेत. यातून सुमारे 92,235 इतकी रोजगारनिर्मिती होणार आहे. यातील एकच करार 3 लाख कोटींचा असून हा जेएसडब्ल्यू यांच्यासोबत करण्यात आला असून, तो स्टील, नवीनीकरणीय ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम-आयर्न बॅटरिज, सोलर वेफर आणि सेल मॉड्युल्स इत्यादी क्षेत्रात करण्यात आला आहे.