महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? शरद पवार , उद्धव ठाकरे मोदी सरकारमद्ये जाणार, दिग्गज नेत्याचा दावा…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “पुढील काही दिवसांमध्ये केंद्रात मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार केंद्रात नरेंद्र मोदी यांच्यासोबत दिसतील, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे.
पंढरपूरमध्ये बोलताना बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार भाजपसोबत जाणार असल्याचा दावा केलाय.
बच्चू कडू म्हणाले की, ज्या पद्धतीने नीतीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे एक दोन बिल पास करण्यासाठी भाजपसोबत थांबले आहेत. ते गेल्यानंतरची सोय सध्या भाजप बघत आहे. त्यामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची उबाठासेना याकडे असणाऱ्या खासदारांची संख्या पाहता संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य हेच दाखवत आहे. आता पुन्हा आपल्याकडे सत्ता येणार असल्याने कोणी पक्ष सोडून जाऊ नये, हाच राऊत यांचा प्रयत्न आहे.
अजित पवार यांच्यावर बच्चू कडू भडकले –
एक रुपया पीक विम्यावरून बच्चू कडू अजित पवारांसह कृषी मंत्री माणिकरावांवर भडकले. अजित पवार म्हणतात माहित नाही आणि माणिकराव म्हणतात बजेट नाही, अशी टीका त्यांनी केली. दरम्यान, एक रूपयात पीक विमा योजना बंद होणार असल्याच्या बातम्या आल्यानंतर बच्चू कडू यांनी समाचार घेतला.
बॅटगे तो कटेंगे म्हणत होता मग दिव्यांग हिंदू नाही का? असा सावलही यावेळी त्यांनी केला. महाराष्ट्राचा इतिहास आधी तर बोटावर मोजण्या इतक्या लोकांनाच 50 ते 70 हजाराचे लीड मिळायचं. आता कुणालाही एक एक लाखाचं लीड मिळते, असा फरक एकाएकी कसा पडला, असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला.