पालकमंत्रिपदावरून महायुतीमध्ये मिठाचा खडा, गोगावलेंचे तटकरेंवर गंभीर आरोप…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “पालकमंत्रिपदावरून आता महायुतीमध्ये जुंपल्याची पाहायला मिळत आहे. पालकमंत्रिपदाची यादी जाहीर करण्यात आली. मात्र या यादीमध्ये शिवसेना नेते भरत गोगावले आणि दादा भुसे यांना स्थान देण्यात आलं नाही.
यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. ते पुन्हा एकदा आपल्या मुळ गावी दरे इथे गेले होते. दादा भुसे आणि भरत गोगावले यांना मंत्रिपद मिळावं अशी त्यांची इच्छा आहे. तर दुसरीकडे पालकमंत्रिपदावरून राष्ट्रवादीचे नेते देखील नाराज असल्याचं समोर येत आहे.
दरम्यान एकनाथ शिंदे नाराज झाल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती दिली. मात्र आधी पालकमंत्री म्हणून ज्यांचं नाव जाहीर करण्यात आलं होतं, तेच या वेळी 26 जानेवारीला ध्वजारोहन करणार आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील भरत गोगावले यांचे समर्थक चांगलेच नाराज झाले आहेत. त्यांनी राजीनामे दिले असल्याची बातमी समोर येत आहे. जोपर्यंत भरत गोगावले हे पालकमंत्री होणार नाहीत तोपर्यंत आम्ही काम करणार नाही, अशी त्यांची भूमिका आहे.
दरम्यान दुसरीकडे भरत गोगावले यांनी थेट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधत गंभीर आरोप केला आहे. राज्यात कोणतच सीट निवडून आलं नाही, मात्र रायगडचा किल्ला राखण्यात यश आलं. आम्ही तिघांनी केलेल्या प्रयत्नामुळे सुनील तटकरे निवडून आले, मात्र त्यांनी तिघांना पाडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप गोगावले यांनी केला आहे, गोगावले यांच्या आरोपांनंतर आता हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.
शिंदे नाराज असल्याची चर्चा
पालकमंत्रिपदाच्या वाटपावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहे. ते दादा भुसे आणि भरत गोगावले यांच्या पालकमंत्रिपदासाठी आग्रही होते. मात्र त्यांना पालकमंत्री पद न मिळाल्यानं एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहे. पालकमंत्रिपदाची यादी जाहीर झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे त्यांच्या मुळगावी दरे इथे गेले होते. त्यानंतर ते पुन्हा मुंबईत परतले आहेत.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….