उद्धव ठाकरेंचा एक आमदार कमी होणार? जात प्रमाणपत्र खोटं असल्याची याचिका दाखल….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “शिवसेना ठाकरे गटाला विधासभा निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीत 21 जागा लढवत ठाकरेंनी 9 खासदार निवडून आणले होते. त्यामुळे विधानसभेला देखील त्यांना चांगला फायदा होईल, असं बोललं जात होतं.
मात्र ठाकरेंना अपेक्षित यश मिळालं नाही. 87 जागा लढवत ठाकरेंचे केवळ 20 आमदार निवडून आले आहेत. पण आता एका आमदाराची आमदारकी धोक्यात आली आहे.
ठाकरे गटाचे उमरगा लोहाराचे आमदार प्रवीण स्वामी यांना मोठा धक्का बसला असून त्यांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी स्वामी यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सुरुवातीला ज्ञानराज चौगुले यांनी प्रवीण स्वामी यांच जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप करत जात पडताळणी समिती धाराशिव यांच्याकडं रीतसर तक्रार दाखल केली होती.
परंतु समितीने याबाबत सुनावणी घेण्याचे अधिकार समितीस नसल्याचे कारण देत चौगुले यांची तक्रार फेटाळली होती. त्यानंतर माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच या याचिकेसह निवडणूक लढविण्याच्या अनेक तांत्रिक आधारावरही ज्ञानराज चौगुले यांनी आमदार प्रवीण स्वामी यांच्या विरोधात माननीय उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
चौगुले यांच्या याचिकेनंतर उच्च न्यायालयाने जात पडताळणी समिती धाराशिव आणि आमदार प्रवीण स्वामी यांना नोटीस पाठवली आहे. या दोन्हीं प्रकरणात माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या वतीने ॲड. एस. एस. गंगाखेडकर हे काम पाहत आहेत. अशाप्रकारे चौगुले यांनी प्रवीण स्वामी यांच्याविरोधात याचिका दाखल केल्याने, स्वामी यांच्यांवर अपात्रतेची टांगती तलवार लटकली आहे. त्यांच्या जवळील जात प्रमाणपत्र बनावट निघालं तर ठाकरे गटाचा एक आमदार कमी होऊ शकतो. त्यांच्या अपात्रतेची कारवाई केली जाऊ शकते. असं झालं तर हा थेट उद्धव ठाकरे यांच्यासाठी धक्का असेल.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….