केंद्राकडून राज्यांना 1 लाख 73 हजार कोटींचा करपरतावा, महाराष्ट्राला 10 हजार 930 कोटींचा निधी, मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधान मोदींसह अर्थमंत्र्यांचे आभार…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “केंद्र सरकारनं देशातील सर्व राज्यांना करपरतावा जारी केला आहे.भांडवली खर्चाला गती देण्यासाठी, विकास आणि कल्याणाशी संबंधित खर्चांना वित्तपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारांना या निधीचं वाट केलं आहे.
केंद्राच्या अर्थ मंत्रालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. केंद्रानं राज्यांना एकूण 1 लाख 73 हजार 030 कोटी रुपयांचे कर हस्तांतरण केलं. महाराष्ट्राला 10930.31 कोटी रुपयांचा निधी मिळाला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचे आभार माणे आहेत.
केंद्र सरकारने काल राज्य सरकारांना त्यांच्याकडे जमा झालेल्या कराच्या रकमेतून 1 लाख 73 हजार 030 कोटी रुपयांचे कर हस्तांतरण जारी केले. डिसेंबर 2024 मध्ये राज्य सरकारांना जारी करण्यात आलेले कर हस्तांतरण 89,086 कोटी रुपये इतके होते.त्या तुलनेत जानेवारी महिन्यातील रकमेमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे.
केंद्रानं राज्यांच्या भांडवली खर्चाला गती देण्यासाठी, तसेच विकास आणि कल्याणाशी संबंधित खर्चाला वित्तपुरवठा करण्यास राज्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने या महिन्यात अधिक रक्कम हस्तांतरित केली जात असल्याची माहिती दिली.
सर्वाधिक निधी उत्तरप्रदेशला
केंद्र सरकारनं जारी केलेल्या निधीपैकी सर्वाधिक निधी उत्तर प्रदेशला देण्यात आला आहे. उत्तर प्रदेशला 31039.84 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. त्या पाठोपाठ बिहारचा नंबर येतो. बिहारला 17403.36 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. मध्य प्रदेशला 13582.56 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक येतो, राज्याला 10930.31 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. महाराष्ट्रापाठोपाठ राजस्थानला देखील चांगला निधी मिळाला आहे. राज्यस्थानला 10426.78 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पंतप्रधान, अर्थमंत्र्यांचे आभार
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या करपरताव्यासंदर्भात आभार मानले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना मनापासून धन्यवाद देतो असं म्हटलं आहे. महाराष्ट्राला 10930.31 कोटी रुपयांचा निधी दिल्याबद्दल आभार मानत असल्याचं ते म्हणाले. यामुळं आमच्या महाराष्ट्रातील लोकांच्या विकासाच्या प्रयत्नांना यामुळं बळ मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात अन् मार्गदर्शनात महाराष्ट्राच्या विकासाचं काम सुरु राहील,असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांची पोस्ट


सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….