धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघात दोनशे बूथ कॅप्चर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “धनंजय मुंडे यांच्या परळी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीवेळी दोनशे मतदान केंद्रे ताब्यात (कॅप्चर) घेण्यात आली होती. मात्र, बीड जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि निवडणूक आयोगाने त्याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभा गटनेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
मुंबईत शुक्रवारी पत्रकार परिषदेत आव्हाड म्हणाले, परळी मतदारसंघात अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजेभाऊ देशमुख यांच्यात थेट लढत होती. पण काही लोकांनी या मतदारसंघातील २०१ बूथ ताब्यात घेतले होते. मतदान केंद्रात आलेल्या मतदारांच्या बोटावर हे लोक शाई लावायचे आणि त्यांच्या आवडीच्या निशाणीचे बटन दाबण्याचे काम या गँगने केले.
परळी विधानसभा मतदारसंघात एकूण ३९६ बूथ आहेत. लोकसभा निवडणुकीत झालेल्या धांदलीनंतर उच्च न्यायालयाने १२२ बूथ अतिसंवेदनशील असल्याचे म्हटले होते. या बूथवर अतिरिक्त सुरक्षा पुरविणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. मात्र जिल्हा अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच निवडणूक अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे २०१ बूथवर हल्ले झाले, तर १०१ बूथ कॅप्चर करण्यात आले. निवडणूक अधिकाऱ्यांनी या बूथ कॅप्चरिंगवर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणही आव्हाड यांनी केली. परळीमध्ये बूथ कॅप्चर करताना गोट्या गीतेचा व्हिडीओ आम्ही दिला आहे. त्याला ताब्यात घेणार का, असा सवाल उपस्थित करत आव्हाड यांनी बूथ कॅप्चर प्रकरणी बीड एसपी, कलेक्टर व संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणीही केली. यावेळी उपस्थित असलेले उमेदवार राजेसाहेब देशमुख म्हणाले, मतदारांना मतदान केंद्रात मतदान करू दिले नाही. दुसरीच व्यक्ती ईव्हीएमचे बटन दाबत होती.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ प्रलंबित मागण्या होणार पूर्ण….
स्वबळावर लढायची खाज असेल तर मिटवून टाकू; एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा भाजपला कडक इशारा…..
पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात रविंद्र धंगेकरांचा माघार घेण्यास नकार; एकनाथ शिंदेंचे नाव घेत म्हणाले, “शिवसेना हा.”
मोहोळांविरोधात रान उठवल्यामुळे शिवसेनेतून हकालपट्टी? चर्चा रंगताच धंगेकर स्पष्टच बोलले, म्हणाले…
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला; बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची राष्ट्रीय ताकद तेजस्वी यादव यांच्यामागे..!
आता महाराष्ट्रात मोठा राजकीय धमाका होणार…!