‘महाराष्ट्राच्या राजकारणात महिन्याभरात मोठा भूकंप’, बड्या नेत्याचा खळबळजनक दावा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सारं काही आलबेल आहे ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. कारण प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे.
त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीत अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सत्तेत सहभागी होण्याचा मुद्दा मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे याबाबत पक्षात दोन मतप्रवाह आहेत. एका गटाचं म्हणणं आहे की, थेट सत्तेत सहभागी व्हावं. तर दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षात पक्ष विलीन करुन सत्तेत सहभागी व्हावं, अशी माहिती सूत्रांनी दिली. या बातम्या ताज्या असतानाच आता शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या महिन्याभरात मोठा भूकंप होणार असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.
शिवसेनेचे नेते तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मोठं भाकीत वर्तवलं आहे. शरद पवार गट लवकरच सत्तेत सहभागी होईल, असा मोठा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या महिन्याभरात भूकंप होईल, असं संजय शिरसाट म्हणाले आहेत. शरद पवार गट महाविकास आघाडीत राहणार नाही, असंही संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
मंत्री संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
“खासदार संजय राऊत यांनी मिठाचा खडा टाकला. त्यामुळे आता महाविकास आघाडीदेखील आता राहणार नाही. काँग्रेसला तर मुळात त्यांची गरजच नाही. शरद पवारांची भूमिका आपण दिवसेंदिवस बदलताना पाहतोय. याचा अर्थ असा होतो की, आपल्याला सत्तेत जायचं आहे. सत्तेशिवाय जे राहू शकत नाहीत, असे पुन्हा मन परिवर्तन होऊन युतीच्या बरोबर येण्याचा किंवा उपमुख्यनमंत्री अजित पवार यांच्याबरोबर जाण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. तो त्याच पद्धतीने या महिन्याभरात दिसून येईल”, असं संजय शिरसाट म्हणाले आहेत. त्यांच्या या दाव्यानंतर आता महिन्याभरात खरंच तशा घडामोडी घडतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….