वर्धा-नांदेड रेल्वेचे काम पुसद विभागात प्रगतीपथावर….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- “वर्धा-नांदेड रेल्वे 284 किमी चे विकास काम महायुतीच्या शासनकाळात प्रगतीपथावर असून वर्धा ते देवळी पर्यंत या रेल्वे मार्गावर रेल्वे वाहतूक सुरू झाली असून या रेल्वे मार्गाचा विकासकामाचे उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले तेव्हा पासून या रेल्वे कामाचा विकासकामाला गती आली असून आज रोजी हे रेल्वे मार्गाचे विकासकाम प्रगतीपथावर असून पुसद विभागात या रेल्वे मार्गाच्या विकासकामाला सुरुवात झाली असल्याने पुसद विभागातील जनते मध्ये उत्साहाचे वातावरण पहावयास मिळत आहे.
सदर रेल्वे मार्गावर 2029 पर्यंत रेल्वे पुसद विभागात धावणार. अशी अपेक्षा दिसत आहे. मध्यंतरी राज्यात महाविकास आघाडी चे शासन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात स्थापन झाल्याने या विकासकामांची गती मंदावली होती त्या वेळेस जर महायुतीचे शासन राज्यात स्थापित झाले असते तर आज रोजी पुसद विभागात या रेल्वे मार्गावर रेल्वे धावली असती अशी चर्चा पुसद विभागात सुरू आहे. या रेल्वे मार्गाने मराठवाडा व विदर्भाच्या सर्वांगीण विकास होईल हे विशेष….