ढाणकी शहरात युरियाची चढ्या दराने विक्री ; कृषी केंद्र चालक करत आहे युरियाची साठवणूक ; आ. ससाने यांचे मतदार संघात दुर्लक्ष
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
स्वप्नील चिकाटे : ९९७०५३५९८८
ढाणकी :
ढाणकी परिसरामध्ये कोरोना रुग्णाच्या संख्येमध्ये होत असलेल्या वाडीने शहरातील बाजारपेठ सहा दिवसाकरीता बंद करण्यात आल्यानंतर बाजारपेठ चालू होताच कृषी केंद्र चालकांनी युरियाची साठवणूक करून शहरांमध्ये युरियाची कृत्रिम टंचाई दाखवली आहे जास्त पैसे दिल्यास युरिया ताबडतोब उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांची शहरातील कृषी केंद्र चालक लूट करत आहेत उमरखेड महागाव मतदार संघाचे आमदार नामदेव ससाने यांना ढाणकी परिसराचा विसर पडत चालला आहे तर शेतकऱ्यांचे काय हाल होत आहे याची पाहणी आ. ससाने करत नसल्याचे शेतकऱ्यांतून बोलल्या जात आहे
सध्या परिसरामध्ये बोगस बियाना विषय कृषी केंद्र चालका विरोधात शेतकऱ्यांचा वाद चालू असताना व शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट असताना शहरातील कृषी केंद्र चालक युरियाची साठवणूक करून शहरांमध्ये युरियाची कृत्रिम टंचाई दाखवत युरियाची चढ्या दराने विक्री करत असल्याचा प्रकार समोर येत आहे याविषयी उमरखेड तालुका कृषी अधिकारी यांना यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी मोहन बाळगले आहे सध्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट व कोरोनामुळे हतबल झालेले शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडला आहे
कृषी केंद्र चालकांनी युरियाची साठवणूक न करता सर्व शेतकऱ्यांना दिलासा देत युरिया नियमाप्रमाणे रक्कम घेऊन शेतकऱ्यांना युरियाची पूर्तता करण्यात यावी अन्यथा शेतकऱ्यांच्या तोंडात येणारा घास, शेतातील फुललेले वृक्ष खता अभावी सुकून जात आहेत त्या वृक्षांना खताची आवश्यकता असल्याने शेतकऱ्यांना खत (युरिया) पुरवठा करण्यात यावा अशी मागणी व्याकुळ शेतकरी कृषी केंद्र चालकांना विनंती करताना दिसत आहे. माजुरी कृषी केंद्र चालक शेतकऱ्यांना युरिया साठी तरसवत आहे
परिसरांमध्ये शेतकऱ्यांचे होत असलेले हाल त्वरित थांबून यवतमाळ जिल्हा कृषी अधिकारी यांनी ढाणकी येथील कृषी चालकांवर चौकशीचे आदेश देऊन युरिया साठवणूक करणाऱ्या कृषी केंद्र चालकांचा परवाना रद्द करण्याची मागणी परिसरातील शेतकरी करत आहे कृषी केंद्र चालकावर कोणती कारवाई होईल याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे