धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री होणार नाहीत..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे कोंडीत सापडले असताना आणि विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरल्याने मुंडे यांनी राजीनामा दिल्याच्या अफवा पसरल्या होत्या.
मात्र, पदाचा राजीनामा दिला नसल्याचे सांगत मुंडे यांनी हे वृत्त खोटे असल्याचे स्पष्ट केले. तरीही त्यांना बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावर पाणी सोडावे लागणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची सोमवारी भेट झाली होती. या भेटीनंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याच्या बातम्या विविध माध्यमांवर सुरु झाल्या. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी मंगळवारी सकाळी मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना, ‘राजीनामा दिलेला नाही”, असे स्पष्टपणे सांगितले.
संतोष देशमुख प्रकरणात वाल्मीक कराड याच्यावर आरोप होत असताना कराड याला खंडणीच्या प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. मात्र मुंडे यांच्यावर अद्याप या प्रकरणात कोणताच ठपका ठेवण्यात आलेला नाही.
त्यामुळे ‘एसआयटी’ आणि ‘सीआयडी’च्या चौकशीतून काही निष्पन्न होईपर्यंत मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याबाबत कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याची भूमिका अजित पवार यांनी घेतली आहे. त्यामुळे अजित पवार यांच्याकडून धनंजय मुंडे यांना सध्या तरी अभय मिळाल्याची चर्चा आहे.
बीडमध्ये अधिकारी कोणाला नेमले? त्यांनी तेथील परिस्थिती हाताबाहेर का जाऊ दिली? त्यांचा कोणाशी काय संबंध आहे? या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे मी देऊ शकत नाही. त्या काळी जे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री होते, पालकमंत्री होते तेच या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतील. राजीनामा मागणे हा त्या पक्षातील श्रेष्ठींचा प्रश्न आहे. माझा प्रोटोकॉल तेवढा नसल्याने मी या विषयात काय बोलणार?
– पंकजा मुंडे, पर्यावरण आणि हवामान बदल खात्याच्या मंत्री

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ प्रलंबित मागण्या होणार पूर्ण….
स्वबळावर लढायची खाज असेल तर मिटवून टाकू; एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा भाजपला कडक इशारा…..
पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात रविंद्र धंगेकरांचा माघार घेण्यास नकार; एकनाथ शिंदेंचे नाव घेत म्हणाले, “शिवसेना हा.”
मोहोळांविरोधात रान उठवल्यामुळे शिवसेनेतून हकालपट्टी? चर्चा रंगताच धंगेकर स्पष्टच बोलले, म्हणाले…
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला; बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची राष्ट्रीय ताकद तेजस्वी यादव यांच्यामागे..!
आता महाराष्ट्रात मोठा राजकीय धमाका होणार…!