धनंजय मुंडेंविरोधात वक्तव्य; मनोज जरांगे यांच्या विरोधात परळीत अदखलपात्र गुन्हा दाखल….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
परळी :- “मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी शनिवारी(दि.4) परभणी येथे काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याविषयी बदनामीकारक वक्तव्य करुन समाजात तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
याप्रकरणी आज(दि.5) परळी शहर पोलीस ठाण्यात तुकाराम बाबुराव आघाव यांनी तक्रार दाखल केली आहे.
आघाव यांच्या तक्रारीवरुन मनोज जरांगेंविरोधात भारतीय न्याय संहिता 2023, सेक्शन 356 (2) प्रमाणे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पाच तास कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले.
मुंडे समर्थकांनी सांगितले की, परभणी येथील मोर्चात मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्याविषयी व समाजाविषयी ‘फिरू देणार नाही, घरात घुसून मारू’ अशाप्रकारचे वक्तव्य केले. समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने हे भडकाऊ वक्तव्य केले गेले. या वक्तव्याचा निषेध करत मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी मुंडे समर्थकांनी रविवारी परळी शहर व संभाजीनगर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले.
जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील, असा इशाराही आंदोलकांनी दिला होता. रविवारी दुपारी साडेबारा वाजल्यापासून पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले, ते सायंकाळ 6 पर्यंत सुरू होते. यावेळी मनोज जरांगे यांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. अखेर सायंकाळी जरांगे पाटलांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर आंदोलकांनी आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….