पहा आज दिवसभराची बातमी “पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह” वर…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मातोश्री मीराबाई फाल्गुनराव पटोले यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झालं.
आज दुपारी दोन वाजता सुकळी (ता. साकोली, जि. भंडारा) इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे.
विधानसभा निवडणुकीत 150 मतदारसंघात गडबड, अजितदादांचा 20 हजार मतांनी पराभव झाल्याचा दावा
आमदार उत्तम जानकर यांनी बारामती इथं येत शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमाशी संवाद साधताना, विधानसभा निवडणुकीत 150 मतदारसंघात गडबड झाल्याचा दावा केला. अजित पवार 20 हजार मतांनी पराभव झाला आहे, असा दावा करत राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यासमवेत लवकरच निवडणूक आयोगाकडे करणार आहे, असे आमदार जानकर यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांचे 13, तर एकनाथ शिंदे आणि भाजपचे, असे 107 मतदार निवडून आले आहेत.जयकुमार गोरे यांनी 30 हजार मते चोरली आहे. यानुसार 13 हजार मतांनी गोरे पडले आहेत. दिल्लीत आम्ही सगळे मिळून आम्ही निवडणूक आयोगाला भेटणार आहोत. पुन्हा निवडणूक घेतली पाहिजे. उद्धव ठाकरे देखील लवकरच मारकडवाडीला जाणार आहेत. हे सरकार चार महिन्यात जमीनदोस्त होईल, असा घणाघात आमदार उत्तम जानकर यांनी केला.
आमदार आव्हाडांविरोधात ट्विट केल्याने रुपाली ठोंबरेंविरुद्ध गुन्हा दाखल
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या तक्रारीवरून रुपाली ठोंबरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात हा गु्न्हा दाखल झाला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे या प्रवक्त्या आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नावाने आलेले फाॅरवर्ड चॅट ट्विट केल्याने हा गुन्हा दाखल झाला आहे. कर नाही और डर कशाला? फाॅरवर्ड चॅट हा गुन्हा होऊ शकतो, हे माझ्याविरुद्ध आरोप करणाऱ्यांना माहीत नाही, हे दुर्दैव आहे, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे. फाॅरवर्ड करण्यात आलेले चॅट हा खोटा, माॅर्फ केलेला आहे, याची संपूर्ण माहिती जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांना दिली. आता पोलिसांना फक्त कारवाई करायची आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
आमदार चंद्रकांत पाटलांनी आमदार धस यांना सुनावले…
बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भात वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांना भाजप आमदार सुरेश धस यांनी कालच्या मोर्चानंतर गंभीर आरोप केले. आमदार धस यांनी बीडमधील एका सांस्कृतिक कार्यक्रमाचा उल्लेख करताना काही अभिनेत्रींचीही नाव घेतली. यात अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचे देखील नावाचा उल्लेख केला. आमदार धस यांनी प्राजक्ता माळी यांचे नाव घेतल्याचे पडसाद मराठी फिल्म इंडस्ट्रीजमध्ये उमटलेत. यावर प्राजक्त माळी आक्रमक झाल्या असून, जाहीर माफी अशी मागणी करताना महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. तसेच दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे माळी यांनी म्हटले आहे. दरम्यान, आमदार धस यांना भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांनी सुनावले आहे. ते म्हणाले, “आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीचे चारित्र्य आणि त्यांच्यावर शिंतोडे उडू नये याची नेहमीच काळजी घेतली. या प्रकरणात अभिनेत्रीचं नाव जोडणं सुरेश धस यांना शोभत नाही. सुरेश धस यांना आज मी फोन करणार आहे. सुरेश धस यांनी कोणत्याही महिलेची नाचक्की आणि बदनामी होईल असं बोलता कामा नये”.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….