प्रकृती खालावल्याने मनमोहन सिंग रुग्णालयात दाखल…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे.
अचानक प्रकृती खालावल्याने मनमोहन सिंह यांना एम्स रुग्णालयातल्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलेले आहे. मात्र त्यांच्या आजारपणाचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.
भारताच्या अर्थव्यवस्थेला दिशा देण्याचे महत्वपूर्ण काम करणारे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे ३ एप्रिल २०२४ रोजी राज्यसभेतून निवृत्त झाले. तब्बल ३३ वर्षांच्या संसदेतील कारकीर्दीनंतर त्यांनी निवृत्ती स्वीकारली.
मनमोहन सिंग यांच्या अनेक निर्णयामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे रुप बदलले. मनमोहन सिंग १९९१ मध्ये पहिल्यांदा राज्यसभेवर गेले होते. माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये त्यांनी अर्थमंत्र्याची जबाबदारी सांभाळली होती. या काळातच अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणाचा निर्णय घेण्यात आला. अर्थव्यवस्थेला बुस्ट देण्यासाठी हा निर्णय निर्णायक ठरला. मनमोहन सिंग हे २००४ ते २०१४ या काळात देशाचे पंतप्रधान देखील राहिले आहेत. मनमोहन सिंग सध्या ९२ वर्षांचे आहेत.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….