विजय मिळालाय पण मी लाजत फिरतोय, दिलीप वळसे पाटलांचे कार्यकर्त्यांना चिमटे…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा आंबेगाव विधानसभेत निसटता विजय मिळाला. प्रतिस्पर्धी उमेदवार देवदत्त निकम यांनी वळसे पाटलांना शेवटच्या फेरीपर्यंत विजयाची प्रतिक्षा करायला लावली.
मात्र अटीतटीच्या लढतीत वळसे पाटील १५०० मतांनी जिंकले. राज्याच्या राजकारणात कायमच महत्त्वाचे स्थान मिळालेले वळसे पाटील निसटत्या फरकाने विजयी झाले, ही बोच त्यांना स्वत:ला लागून राहिली आहे. याचवरून आभार दौऱ्यात त्यांनी कार्यकर्त्यांना चिमटे काढले.
विधानसभा निवडणुकीत मी विजयी झालोय पण सगळीकडे लाजत लाजत फिरतोय. मात्र विरोधातले (शरदचंद्र पवार पक्षाचे देवदत्त निकम) पराभूत होऊनही गावच्या पाटलासारखे फिरतायेत, अशी टोलेबाजी वळसे पाटील यांनी केली.
तसेच मागील आठवड्यात उत्साही कार्यकर्त्यांनी मंत्रिपदाची मागणी केल्यानंतर, १५०० हजाराने निवडून आलो म्हणून मंत्री करा, असे पक्ष नेतृत्वाला सांगू का? अशी विचारणा करीत त्यांनी कार्यकर्त्यांचे कान उपटले.
राष्ट्रवादीत सत्तेत असताना वळसे पाटलांकडे कोणतेच पद नाही, असे बहुदा प्रथमच घडते आहे!
हसन मुश्रीफ वगळता जुन्या पिढीतील नेत्यांना दूर सारत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीतील नवीन चेहऱ्यांना संधी दिली. तसेच अडीच वर्षांनंतर सध्याच्या मंत्र्यांना बदलून नव्या नेत्यांना त्यांनी मंत्रिपदावर काम करण्याची जबाबदारी दिली. माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ, मकरंद आबा पाटील, बाबासाहेब पाटील, इंद्रनील नाईक अशा नेत्यांना अजित पवार यांनी मंत्री करून महत्वाची खातीही दिली आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी सत्तेत आहे आणि दिलीप वळसे पाटील मंत्री नाहीत अथवा महत्त्वाचे पद नाही, असे प्रथमच घडत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकरिता कामाला लागा कार्यकर्त्यांना सूचना
विधानसभा निवडणूक निकाल लागलाय. आपला विजय झाला आहे. आता विधानसभेच्या चर्चांना ब्रेक देऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामांना लागा, अशा सूचना वळसे पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….