गोंधळातच संसद अधिवेशनाची सांगता; विधायक चर्चा न झाल्याने दोन्ही सभागृहांच्या अध्यक्षांकडून नाराजी व्यक्त….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “डॉ. बाबासाहेब आंबेडकर अवमाननेच्या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांच्या गदारोळातच आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले. अखेरच्या दिवशी देखील दोन्ही सभागृहांमध्ये जोरदार घोषणाबाजी होऊन अनिश्चित काळासाठी कामकाज तहकूब करण्यात आले.
या गोंधळामुळे संतप्त झालेल्या लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी ”संसदेची प्रतिष्ठा जपा” अशा शब्दांत फटकारले. तर राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनकड यांनी ”विधायक चर्चा हवी की विध्वंसक गोंधळ हवा यातील एक निवडण्याची वेळ आली आहे.”, अशी उद्विग्नता व्यक्त केली.
संसदेचे हिवाळी अधिवेशन आज अनिश्चित काळासाठी तहकूब झाले. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अपमान प्रकरणावरून गुरुवारी संसदेच्या प्रवेशद्वारावर सत्ताधारी आणि विरोधी खासदारांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीचे पडसाद आजही उमटले. काँग्रेसच्या तसेच ‘इंडिया’आघाडीच्या खासदारांनी राष्ट्रपती भवनाजवळच्या विजय चौकापासून संसदेपर्यंत मोर्चा काढून निषेध व्यक्त करताना गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपच्या खासदारांनीही संसद भवनाच्या आवारातील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ निदर्शने करताना राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.
कामकाजाबाबत टिपणी नाही
संसद भवनाच्या आवारातील गोंधळाचे वातावरण सभागृहामध्येही दिसून आले. लोकसभेचे कामकाज सकाळी सुरू होताच विरोधी पक्षांनी घोषणा देत गदारोळ केला. या गोंधळामुळे संतप्त झालेल्या लोकसभाध्यक्षांनी संसदेच्या प्रवेशद्वारावर निदर्शने केल्यास कारवाई होईल, अशी तंबी दिली आणि ‘संसदेची प्रतिष्ठा जपा’ अशा कानपिचक्या देत लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केले. एरवी अधिवेशन समाप्तीवेळी पीठासीन अधिकाऱ्यांकडून कामकाजाबाबत टिपणी केली जाते. मात्र यावेळी लोकसभेत तसे काहीही झाले नाही.
राज्यसभेतही गदारोळच
राज्यसभेमध्येही आज सकाळी कामकाज सुरू होताच गोंधळ झाल्याने अध्यक्ष जगदीप धनकड यांनी सभागृहाचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब केले. यादरम्यान विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे आणि अन्य नेत्यांसमवेत सभापतींच्या दालनात बैठकही पार पडली. त्यानंतर दुपारी बारा वाजता सभागृह सुरू होताच अधिवेशन समाप्तीची घोषणा राज्यसभेचे अध्यक्ष धनकड यांनी केली. ”संसद सदस्य या नात्याने आपण लोकांच्या टीकेचे धनी ठरत आहोत.
सातत्याने होणारा गोंधळ हा लोकांचा लोकशाही संस्थांवरील विश्वास घटविणारा आहे. विधायक चर्चा हवी की विध्वंसक गोंधळ हवा यातील एक निवडण्याची वेळ आली आहे,” अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. तसेच आपला लोकशाही वारसा जपण्यासाठी राजकीय मतभेदांपलीकडे जाऊन संसदीय संवादाची प्रतिष्ठा पुनर्स्थापित करण्याची गरज असल्याचे प्रतिपादनही धनकड यांनी केले.
४०.०३ टक्के राज्यसभेची उत्पादकता
४३ तास २७ मिनिटे कामकाज

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….