चार वर्षिय मुलाला विष पाजून आईची आत्महत्या ; आत्महत्येचे कारण अस्पष्ट
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
स्वप्नील चिकाटे : ९९७०५३५९८८
ढाणकी :
उमरखेड तालुक्यातील
बिटरगाव पोलिस हद्दीत येणाऱ्या निंगणुर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या आनंतवाडी येथे माहेरी आलेल्या आईने शेतात चार वर्षिय मुलाला विष पाजून स्वतःही किटकनाशक विष प्राशन करून आत्महत्या केली आहे.. ही घटना शुक्रवारी (ता. १८) सायंकाळी उघडकिस आली आही. हदयहेलावुन टाकणाऱ्याया घटनेने समाजमनसुन्न झाले आहे. मात्र आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. सविता विशाल रणमले (३०) असे मृत विवाहितेचे नाव असून ,सम्राट विशाल रणमले (४) मुलाचे नाव आहे.
सविता चा विवाह आठ वर्षापूर्वी कुपटी तालुका माहूर येथील शिक्षक असलेल्या विशाल रणमले सोबत झाला होता. शुक्रवारी सविता आपल्या दोन्ही मुलांना घेऊन माहेरी निघून आनंदवाडी येथे वडीलाकडे माहेरी आली होती. शनिवारी सकाळी तिचा मोठा मुलगा विराट (वय ७) वर्षे हा आजी सोबत शेतात गेला होता त्यावेळी घरी असलेल्या सविताने स्वतःच्या लहान मुलगा सम्राटला विषारी औषध पाजून स्वतःही विष प्राशन केले ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच दोघांनाही फुलसांगी प्राथमिक आरोग्य केंद्र उपचाराकरिता नेण्यात आले.मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले.
त्यांना मृतदेह महागाव तालुक्यातील सवना ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आले शव विच्छेदना नंतर मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद महागाव पोलिस स्टेशन येथे देण्यात आली आहे. आनंतवाडी हे गाव पोलीस स्टेशन बिटरगाव हद्दीत असल्याने पुढील तपासणीसाठी हे प्रकरण बिटरगाव पोलीस स्टेशन कडे पाठवले जाणार असल्याची माहिती महागाव पोलिसांनी दिली. विवाहितेने मुलांसह आत्महत्या का केली याचे कारण अद्यापही कळू शकले नाही. या घटनेमुळे आनंदवाडी व निंगणुर परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे
आत्महत्या संदर्भात बिटरगाव पोलीस स्टेशनला लेखी फिर्याद आला नाही. लेखी तक्रार आल्यास या घटनेचा तपास आम्ही करू
पोलीस उपनिरीक्षक रामकिसन जायभाये बिटरगाव पोलीस स्टेशन