महागाव शहरातील कोरोनामुक्त झालेल्या दोन तरुणांकडून प्लाझ्मा दान, कोरोना योद्धांचे सामाजिक भान
सुवर्णकार संघटनेकडून दानशुरांचे कौतुक
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख :९६३७८८६७७७
महागाव :
कोरोनाच्या जाळ्यात अडकलेल्या महागाव मधील तीन तरुणांनी कोरोनावर मात केल्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारांमध्ये मदत करण्यासाठी आपल्या शरीरातील प्लाझ्मा दान करण्यासाठी स्वयुफुर्ती ने समोर आले आहेत.त्यामुळे कोरोना योद्धांनी सामाजिक भान ठेवल्याने या तरुणांचे महागाव सुवर्णकार संघटनेकडून कौतुकाचा वर्षाव केल्या जात आहे.
हे तीनही तरुण कोरोना बाधित अहवाल आल्यानंतर मृत पावलेल्या सराफा व्यवसायिकाच्या हाय रिस्क कॉन्टॅक्ट मध्ये असलेल्या एका सराफा व्यवसायिक व दोन सराफा कारागिरांना कोरोनाची बाधा झाली होती.
डॉक्टरांनी केलेल्या उपचाराला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने ते पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत पंकज रुणवाल व रामेश्वर तुंगर यांनी प्लाझ्मा दान केला आहे. तर उर्वरित कोरोनामुक्त झालेले प्लाझ्मा दान करणार करणार आहे अशी माहिती या कोरोना योद्धांनी दिली आहे.
यावेळी या कोरोना योद्धा शी संपर्क करून प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणले की,
कोरोनामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. त्यापासून सावध राहणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील वैद्यकीय चमू कोरोनाला लढा देण्यासाठी सज्ज आहे. आपण सर्वांनी मिळून जर कोरोनाला लढा दिला तर नक्की महाराष्ट्र कोरोनामुक्त होईल, असे समान विश्वास या दोघांनी व्यक्त केला आहे. तसेच डॉक्टरांनी आपलं कर्तव्य निभावल्यानंतर प्लाझ्मा दान करत कोरोनाच्या विरोधात संघर्ष पुकरण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दिलेले नियम सर्वांनी पाळावे. तसेच समाजात जे व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत, त्यांनी प्लाझ्मा दान करावा असे आवाहन केले आहे. या दान शूरानी आवाहन करीत डॉक्टरांचे आभार मानले आहेत.