“लिव्ह-इन रिलेशनशिप आणि समलैंगिक विवाहामुळे सामाजिक व्यवस्था कोसळेल”, नितीन गडकरींचे मोठे विधान…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. गडकरी कायमच विविध मुद्द्यांवर थेट बोलत असतात. दरम्यान आता नितीन गडकरी यांनी लिव्ह-इन रिलेशनशिप आणि समलैंगिक विवाहावर त्यांचे मत मांडले आहे.
अनफिल्टर्ड समदीश या युट्यूब चॅनलवर नितीन गडकरी यांनी याबाबत भाष्य केले आहे. गडकरी म्हणाले की, “लिव्ह-इन रिलेशनशिप आणि समलैंगिक विवाह समाजाच्या नियमांच्या विरुद्ध आहेत आणि यामुळे सामाजिक व्यवस्था कोसळू शकते.”
लिव्ह इन रिलेशनशिप
या कार्यक्रमात युट्यूबर समदीशने नितीन गडकरी यांना लिव्ह इन रिलेशनशिप आणि समलैंगिक विवाह यावर प्रश्न विचारला होता. याला उत्तर देताना गडकरी म्हणाले की, “लिव्ह-इन रिलेशनशिपमुळे समाज व्यवस्था कोसळेल. समाजात काही नियम आहेत आणि त्यांचे पालन केले पाहिजे. मी एकदा लंडनमधील ब्रिटीश संसदेला भेट दिली होती आणि यूकेचे पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री यांना त्यांच्या देशासमोरील प्रमुख समस्यांबद्दल विचारले होते. त्यावेळी मला सांगण्यात आले की, युरोपीय देशांमधील सर्वात मोठी समस्या ही आहे की पुरुष आणि महिलांना लग्न करण्यात रस नाही. ते लिव्ह इन रिलेशनशिपचा पर्याय निवडत आहेत.”
समलैंगिक विवाह
या पॉडकास्टमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी समलैंगिक विवाहावरही भाष्य केले. समलैंगिक विवाहाबातच्या प्रश्नाला उत्तर देताना गडकरी म्हणाले की, ” समलैंगिक विवाहामुळे सामाजिक व्यवस्थेचे पतन होईल”.
“आदर्श भारतात घटस्फोटांवर बंदी आणावी का” असा प्रश्नही गडकरी यांना विचारण्यात आला होता. याला उत्तर देताना ते म्हणाले, “नक्कीच नाही. पण लिव्ह-इन संबंध चांगले नाहीत”.
विशेष म्हणजे, २०२३ मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता देण्यास नकार दिला होता. पण राज्यांना केंद्रीय कायदा नसल्यास समलैंगिक विवाह कायदेशीर करणारे कायदे करण्याचा अधिकार असल्याचे आपल्या निर्णयात सांगितले होते.
नितीन गडकरी यांनी या मुलाखतीत गडकरी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, (RSS) बाळासाहेब ठाकरे, मांसाहार आणि इतर मुद्दांवर विचारलेल्या प्रश्नांवरही उत्तरे दिली. गडकरींची ही मुलाखत सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. दरम्यान सोशल मीडियावर अनेक युजर्स यावर प्रतिक्रियाही देत आहेत.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….