भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी दोन नावांची चर्चा ; ‘हे’ नाव होणार फायनल..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे त्यांच्या जागी भाजप कोणाला संधी देणार, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.
सध्यातरी भाजपच्या गोटातून दोन नावांची चर्चा आहे. प्रचंड बहुमत असलेल्या सत्ताधारी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष कोण होईल, याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत.
भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी रविवारी रवींद्र चव्हाण यांच्या नावाची चर्चा होती. सोमवारी पुन्हा प्रवीण दरेकर यांचं नाव पुढे येत आहे. दरेकर यांच्या खांद्यावर पक्ष अध्यक्ष पदाची जबाबदारी देईल, असं बोललं जात आहे.
भाजपच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पडद्यामागे काम करणारा महत्त्वाचा चेहरा म्हणून प्रवीण दरेकर यांच्याकडे पाहिलं जातं. देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांचं नाव सर्वात पुढे आहे. विधान परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेते म्हणूनही त्यांच्याकडे जबाबदारी होती.
राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न उद्धवला असताना प्रवीण दरेकर यांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. यावेळी जातीय समीकरण साधताना प्रवीण दरेकर यांच्याही नावाची भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
मंत्रिमंडळातील नवीन चेहरा
चंद्रशेखर बावनकुळे, गणेश नाईक, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, अशोक उईके, आशिष शेलार, दत्तात्रय भरणे, शिवेंद्रराजे भोसले, माणिकराव कोकाटे, जयकुमार गोरे, नरहरी झिरवळ, संजय सावकारे, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले, मकरंद पाटील, नीतेश राणे, आकाश फुंडकर, बाबासाहेब पाटील, प्रकाश आबिटकर, माधुरी मिसाळ, आशिष जैस्वाल, पंकज भोयर, मेघना बोर्डीकर, इंद्रनील नाईक.
यांना मंत्रिमंडळातून डच्चू
सुधीर मुनगंटीवार, विजयकुमार गावित, रवींद्र चव्हाण, सुरेश खाडे, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, अनिल पाटील, संजय बनसोडे

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….