बेकाबू पोलिसाच्या डोक्यात धर्म किंवा द्वेष.; परभणी घटनेप्रकरणी काय म्हणाले आंबेडकर..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
परभणी :- “येथील रेल्वे स्थानकाबाहेर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची काही दिवसांपूर्वी विटंबना झाली होती. यानंतर उफाळेल्या हिंसाचारप्रकरणी काही जणांना ताब्यात घेण्यात आले होते.
यातील सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा न्यायालयीन कोठडीतील मृत्यू झाला आहे. याप्रकरणी राजकारण तापताना दिसत आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या घटनेविरोधात आज परभणीत धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनाही आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी पोलिसांवर निशाणा साधला.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, द्वेष आणि धर्म या दोन गोष्टी कोणाच्यातरी डोक्यामध्ये बसणार आहेत. ज्याच्या कोणाच्या डोक्यामध्ये या गोष्टी बसणार आहेत, तो बेकाबू होणार आहे. या ठिकाणी काही पोलीस आपण बेकाबू झालेले पाहिले आहेत. जो पोलीस बेकाबू झालेला आहे, त्याच्या डोक्यामध्ये धर्म किंवा द्वेष पेरला गेलेला आहे. जसं काही जणांनी कायदा आपल्या हातात घेतला आणि लोकांना बडवायला सुरुवात केली. ही परिस्थिती आता आपल्या देशामध्ये वाढत जाणार आहे. हे थांबेल असं वाटत नाही. याला जर थांबवायचं असेल तर काही गोष्टी पाळल्या गेल्या पाहिजेत, असे म्हणत आंबेडकर यांनी तरुणांना आव्हान केले.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मी जे सांगणार आहे, ते अनेक लोकांना पटणार नाही. ते लोक म्हणतील दंगलीचा आणि याचा काय संबंध आहे. पण तुम्हाला दारु पिणं सोडावं लागेल. तुम्हाला आयडॅक्स खाणं सोडावं लागेल, कारण ती पण एक नशा आहे. लोक आयडॅक्स ब्रेडवर लावून खातात. त्यामुळे ती नशा सोडून स्वत:ला मजबूत करावं लागेल. यासाठी तुम्हा दररोज चार किलोमीटर पळायला लागेल. आता पळायचं कशाला असा तुमच्या मनात प्रश्न उपस्थित झाला असेल. तुम्ही जर पळालात तर मजबूत बनाल आणि एसआरपी, मिलिट्री, सीआरपी, बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेसमध्ये व पोलीस खात्यामध्ये जाऊ शकाल. जसं असं केलं तर आज जो बेकाबू झालेला पोलीस आहे, त्याच्याशी तुम्हाला संवाद साधता येईल, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केले.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….