‘डच्चू नाही तर भुजबळांना राज्यपाल बनवले जाणार’; भाजपा नेत्याचा मोठा दावा…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार दोन दिवसापूर्वी झाला. या मंत्रिमंडळात काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली.
तर काही जुन्या चेहऱ्यांना पुन्हा संधी दिली नाही. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे भुजबळ नाराज आहेत. काल त्यांनी माध्यमांसमोर उघड-उघड नाराजी व्यक्त केली. होय, मी नाराज आहे. मनोज जरांगे यांना अंगावर घेतले, ओबीसींचा लढा मी लढलो. त्याचे बक्षीस मिळाले,अशी संतप्त प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली. दरम्यान, आता भाजपा नेते आशिष देशमुख यांनी भुजबळ यांना राज्यपाल बनवले जाऊ शकते असा मोठा दावा केला आहे.
भाजपा नेते आशिष देशमुख यांनी आमदार छगन भुजबळ यांच्या बाबतीत मोठा दावा केला आहे. आशिष देशमुख म्हणाले, मंत्र्यांना डच्चू देण्याचा प्रश्न येत नाही. नवीन सरकार स्थापन झाले आहे. भरघोस आमदार महायुतीकडे आहेत. प्रत्येक पक्षाला ठरलेल्या मंत्रिमंडळाच्या संख्येपैकी काही लोकांना संधी देणे गरजेचे होते. म्हणून जुने अनुभवी लोकही त्यात आहेत. नव्या लोकांना अनुभव देण्याच काम सरकारने केले आहे, असंही देशमुख म्हणाले.
“यावेळी कोणाला संधी मिळाली नसेल तर त्यामागे दुसऱ्या कोणाला संधी मिळावी हाच एक हेतू आहे. १९८५ पासून भुजबळ साहेबांनी महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावली आहे. राज्याचे विविध विभागाचे मंत्रिपदही त्यांनी सांभाळले आहे. आज अजित पवार यांनी त्यांना मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला असेल तर नक्कीच त्यामध्ये त्यांचा मोठा काही निर्णय होणार असेल. मोठा निर्णय म्हणजे देशाच्या कोणत्या ना कोणत्या राज्याचे भुजबळ साहेब राज्यपाल होऊ शकतात. त्यांच्या पक्षाने तशी योजना बनवली असेल, असा मोठा गौप्यस्फोट आशिष देशमुख यांनी केला.
भुजबळ अधिवेशन सोडून नाशिकला रवाना
राज्य मंत्रिमंडळात वर्णी न लागल्याने नाराज असलेले अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी सोमवारी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली. होय, मी नाराज आहे. मनोज जरांगे यांना अंगावर घेतले, ओबीसींचा लढा मी लढलो. त्याचे बक्षीस मिळाले, अशी संतप्त प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली. तसेच मंत्रिपद कितीवेळा आले आणि गेले, तरी भुजबळ संपला नाही, असेही ते म्हणाले. विधानसभेचे पहिल्या दिवसाचे कामकाज संपताच भुजबळ सभागृहाबाहेर पडले.
यावेळी पत्रकारांशी बोलताना भुजबळ यांनी आपली नाराजी उघड केली. ते म्हणाले, मी सामान्य कार्यकर्ता आहे. मला डावलले काय आणि फेकले काय, काय फरक पडतो. ओबीसींच्या लढ्यामुळेच महायुतीला मोठे यश मिळाले. अजित पवारांशी मी चर्चा केली नाही आणि मला तशी गरजही वाटली नाही, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले. भुजबळ शपथविधीला उपस्थित नव्हते. मंत्रिमंडळात वर्णी न लागल्याने ते नाराज असल्याचे बोलले जात होते.

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….
मोदी-शहांचे स्वप्न पूर्णत्वाकडे..! बंगालमध्ये भाजपने पार केला बहुमताचा आकडा; २ दशकांनंतर सत्तांतर, ममतांना मोठा धक्का….