“जयंत पाटील महायुतीत जाणार, एक मंत्रीपद राखीव”, दादांच्या विश्वासू नेत्याचं थेट विधान….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “रविवारी महायुतीच्या मंत्रीमंडळाचा शपथ विधी पार पडला. या शपथविधी सोहळ्यात महायुतीच्या ३९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी झाला आहे.
आता मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या आमदारांची बेरीज केली तर हा आकडा ४२ इतका होतो. कायद्यानुसार महाराष्ट्रात ४३ मंत्रीपदांची तरतूद आहे. असं असूनही एक मंत्रीपद रिक्त ठेवल्याने आता विविध चर्चांना उधाण आलं आहे.
महाविकास आघाडीतला एक मोठा नेता महायुतीत जाणार आहे. त्या नेत्यासाठीच हे मंत्रीपद रिक्त ठेवण्यात आल्याची कुजबूज रविवारपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. एकीकडे ही चर्चा सुरू असताना अजित पवार गटाचे आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. महायुतीतलं एक राखीव मंत्रीपद शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासाठी रिक्त ठेवण्यात आलंय. ते लवकरच महायुतीत सहभागी होतील, असं थेट वक्तव्य मिटकरी यांनी केलं. राजकीय वर्तुळात विविध तर्क वितर्क लढवले जात आहे.
महायुतीतल्या रिक्त मंत्रीपदाबाबत वक्तव्य करताना अमोल मिटकरी म्हणाले की, मागच्या एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्येही एक मंत्रीपद रिक्त ठेवलं होतं. ते मंत्रीपद जयंत पाटलांसाठी रिक्त ठेवलं होतं. पण त्यावेळी त्यांनी फार विचार केला. नंतरच्या काळात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला बहुमत मिळालं. त्यामुळे आपल्याला आता महायुतीत जायची गरज नाही, असं जयंत पाटलांना वाटलं. मात्र आता अशी परिस्थिती आहे की, जयंत पाटील महायुतीत सहभागी होऊ शकतात.”
“मला असं वाटतं की मंत्रिमंडळात जे एक मंत्रीपद रिक्त ठेवलं आहे. त्यासाठी योग्य व्यक्ती, योग्य वेळ आणि योग्य निर्णय घेणाऱ्या नेत्यासाठी आहे. त्यामुळेच एक मंत्रीपद राखीव ठेवलं आहे. वन डाऊनसाठी जो प्लेअर येतो, त्यांच्यासाठी ती जागा राखीव ठेवली आहे. पण मला जेवढी माहिती आहे, त्यानुसार जयंत पाटील नक्की महायुतीत येतील,” असं थेट वक्तव्य मिटकरींनी केलं आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..