चातारी येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड आठ जुगारी पोलिसांच्या ताब्यात : ५२ हजाराचा मुद्देमाल जप्त
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
स्वप्नील चिकाटे : ९९७०५३५९८८
ढाणकी :
पासून जवळच असलेल्या चातारी येथे काही नागरिक जुगार खेळत असल्याच्या गोपनीय माहितीवरून 16 जुलै रोजी दुपारच्या दरम्यान पोलिसांनी धाड टाकून आठ आरोपींना रंगेहात पकडून त्यांच्यावर उमरखेड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याने जुगा-यांचे धाबे दणाणले आहेत.
या जुगारामध्ये अरविंद गणपत माने, विजय रामराव माने, दिगंबर रामा पानपट्टे, गजानन साहेबराव माने, विठ्ठल नारायण मस्के, शेख असलम शेख मेहबूब, गंगाधर संभाजी पानपट्टे, वैभव रामभाऊ हमद हे आठ आरोपी जुगार खेळताना सापडले असून त्यांच्याकडून जुगारातील नगदी १५१०० रुपये ,मोटारसायकल व मोबाईल असा सर्व मिळून ५२ हजार १५० चा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्यांच्यावर भांदवि ४, ५, १८८, २६९, २७१ नुसार पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. ही कार्यवाही एलसीबी चे निलेश शेळके, मुन्ना आडे, मोहम्मद ताज, पोहेका वास्टर यांनी पार पाडली तर पुढील कार्यवाही ठाणेदार मोतीराम बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली एनपीसी रवी चव्हाण करीत आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..