लालकृष्ण आडवाणींची तब्येत बिघडली, दिल्लीच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलय. लालकृष्ण आडवाणी सध्या 97 वर्षांचे आहेत. मागच्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत खराब होती.
शनिवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलय. मागच्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलय. याआधी ऑगस्ट महिन्यात त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
याआधी आडवाणींना ऑगस्ट महिन्यात रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 3 जुलैला लालकृष्ण आडवाणींना दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याआधी 26 जूनला दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आलेलं. त्यांना न्यूरोलॉजी विभागाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. त्यांची एक छोटीशी सर्जरी झाली. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
घरी जाऊन दिला ‘भारत रत्न’
लालकृष्ण आडवाणी मागच्या काही काळापासून आरोग्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त आहेत. त्यामुळेच ते घरी असतात, कुठल्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत नाहीत. आडवाणी यांना यावर्षी देशातील सर्वोच्च सम्मान ‘भारत रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पण आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे ते राष्ट्रपती भवनात पुरस्कार स्वीकारण्यासाठी येऊ शकले नाहीत. त्यांना त्यांच्या घरी जाऊन ‘भारत रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आडवाणींनी सरकारमध्ये कुठली पद भुषवली आहेत?
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 30 मार्चला लालकृष्ण आडवाणींच्या निवासस्थानी जाऊन त्यांना ‘भारत रत्न’ पुरस्कार प्रदान केला होता. यावेळी आडवाणींच्या निवासस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड़, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. 2015 साली त्यांना पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. आडवाणी वाजपेयी सरकारमध्ये उप पंतप्रधान होते, ते देशाचे गृहमंत्री सुद्धा होते.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..