“आमचे खासदार मोदींना भेटायला गेले, पण…”, ‘त्या’ भेटीबाबत उद्धव ठाकरे म्हणाले…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत. यावर सरकारची काय भूमिका आहे, हे सरकारनं स्पष्ट करावं अशी मागणी ठाकरेंनी केली आहे.
शिवाय गुरुवारी ठाकरे गटाचे खासदार मोदींच्या भेटीसाठी गेले होते, मात्र मोदींनी भेट नाकरली, याबाबतही ठाकरेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. संसदेत बाकीचे विषय बाजुला करून बांगलादेशात हिंदुंवर होणाऱ्या अत्याचारावर चर्चा करावी, अशी मागणीही ठाकरे यांनी केली.
उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले, “संसदेत महत्त्वाच्या विषयांना बगल देऊन, नको त्या विषयाकडे चर्चा भरकटवली जातेय. मागील काही दिवसांपासून सातत्याने बांगलादेशात हिंदुवर अत्याचार होतायत. हल्ले होतायत. दोन महिन्यांपूर्वी बांगलादेशचा क्रिकेट संघ भारतात आला होता. बांगलादेशात जर हिंदूंवर अत्याचार होत असतील, तर अशा देशासोबत क्रिकेट खेळणं कितपत योग्य आहे? साहजिकच यावर सत्ताधारी पक्षाकडून काही उत्तर मिळालं नाही. सातत्याने हे हल्ले सुरू आहेत.”
बांगलादेशात इस्कॉनचं मंदिर जाळलं. इस्कॉनच्या प्रमुखांना अटक केली, तरी आपण गप्प आहोत. मग आपले विश्वगुरू हे अत्याचार का पाहत बसलेत माझी पंतप्रधानांना मोदींना विनंती आहे, जसं आपण एका फोनवर युक्रेन-रशिया युद्ध थांबवलं होतं, तसंच बांगलादेशातील हिंदुंवरील होणाऱ्या अत्याचारावर काहीतरी भूमिका घ्यावी, इथं केवळ बटेंगे तो कटेंगे म्हणून उपयोग नाही, जिथे अत्याचार होतायत, तिथे आपली धमक दाखवण्याची गरज आहे, असंही ठाकरे म्हणाले.
हेच प्रश्न मांडण्यासाठी आमच्या खासदारांनी गुरुवारी मोदींची भेट मागितली होती, मात्र त्यांनी ही भेट नाकारली, असं ठाकरे म्हणाले. आम्ही खासदारांना सांगितलं होतं की, रितसर जाऊन आपण पंतप्रधानांना पत्र द्यावं. बांगलादेशात हिंदुंवर होणाऱ्या अत्याचाबद्दल सरकार काय पावलं उचलतंय, याची माहिती घ्यावी. संसदेत बाकीच्या चर्चा बाजुला ठेवून बांगलादेशात हिंदुंवर होणाऱ्या अत्याचारावर केंद्र सरकारची भूमिका काय आहे. ते कोणती पावलं उचलणार आहेत, याची माहिती घ्यावी. बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना भारतात आल्या, त्या इथं सुरक्षित आहेत. मात्र बांगलादेशात अडकलेले गोरगरीब हिंदू मात्र रोज अत्याचार भोगतायत, यांच्या सुरक्षेबाबत सरकार काय करतंय, हे त्यांनी सांगायला पाहिजे, असंही ठाकरे म्हणाले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..