सेनेमुळे राष्ट्रवादीचेही अर्थखातं जाणार..? भाजपा काय निर्णय घेणार..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 20 दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. तर, महायुतीचे सरकार स्थापन होऊन आठवडा उलटला आहे. येत्या दोन दिवसात नागपुरात हिवाळी अधिवेशनास सुरुवात होणार आहे.
मात्र, असे असतानाही अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकलेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता. 12 डिसेंबर) रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डांसोबत याबाबतची चर्चा केली आहे. मात्र, यासंदर्भातील कोणताही अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही. महायुतीचा खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याचे स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून सांगण्यात आले आहे. मात्र, हे खातेवाटप कधी होणार? याबाबतची कोणतीही माहिती त्यांनी दिलेली नाही.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे महायुतीतील खातेवाटपाचा तिढा सुटलेला नसल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. कारण गृहखात्यासाठी स्वत: एकनाथ शिंदे आग्रही आहेत. मात्र भाजपा गृहखाते सोडण्यास तयार नाही. गृहखात्यासह अर्थखातेही भाजपा स्वत:कडेच ठेवण्याची शक्यता आहे. कारण गृहखाते जर शिवसेनेला मिळणार नसेल तर अर्थखातेही भाजपाने स्वत:कडेच ठेवावे, अशी भूमिका शिवसेनेने घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अर्थखाते जाण्याची शक्यता असून हे दोन्ही महत्त्वाची खाते भाजपा स्वतःकडे ठेवू शकते. त्यामुळे असे झाल्यास अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महसूल तर शिंदेंच्या शिवसेनेला नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम खात्यावर समाधान मानावे लागेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी (ता. 12 डिसेंबर) केंद्रीय मंत्री अमित शहा यांची संसदेत भेट घेतली. यावेळी उद्या शनिवारी, 14 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे अमित शहांनी म्हटल्याचे अजित पवार यांच्याकडून सांगण्यात आले. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीतील खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरला असून मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे जर का शनिवारी महायुतीतील मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर 30-35 आमदार मंत्रिपदाची शपथ घेवू शकतात, त्यात भाजपचे 15-16, शिवसेनेचे 8-9 आणि राष्ट्रवादीचेही 8-9 आमदार शपथ घेण्याची शक्यता आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..