सरकारमध्ये मंत्रीपद तर विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस, सेनेत स्पर्धा…!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- “येत्या सोमवारपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होत आहे. आज विधिमंडळ सचिवालय अधिकारी, कर्मचारी दाखल झाले. उद्या गुरुवारी सचिवालयाचे प्रशासकीय कामकाज सुरू होणार आहे.
विरोधी पक्षनेतेपद मिळेल असे संख्याबळ विरोधकांकडे नसताना विरोधी पक्षनेता बंगला आणि त्यांच्या पत्र परिषदेची पूर्व तयारी सार्वजनिक बांधकाम विभागाने केली आहे.
यावरून विरोधी पक्षनेतेपद विरोधकांना मिळणार असे संकेत आहेत. विधानसभेत शिवसेना उबाठा गटाला विरोधी पक्षनेतेपद मिळाल्यास विधान परिषदेत आम्हाला संधी मिळावी अशी काँग्रेसची अपेक्षा आहे. एकीकडे सरकारमध्ये मंत्री पदासाठी चांगल्या खात्यासाठी लॉबिंग सुरू असताना विरोधकांमध्ये विरोधी पक्षनेते पदासाठी स्पर्धा सुरू आहे.
यावेळी 16 ते 21 डिसेंबर असे एकच आठवड्याचे अधिवेशन होणार असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या होमपीचवर अडचणीत आणण्यासाठी विरोधक अपुरे संख्याबळ असूनही एकवटण्याची शक्यता आहे. शिवसेना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे पूर्णवेळ नागपुरात राहणार असल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडनुकीत कार्यकर्त्यांचा जोश कायम राहण्याच्या दृष्टीने हिवाळी अधिवेशन गाजविण्याचा विरोधकांचा प्रयत्न दिसत आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….