सरपंचाचं अपहरण अन् हत्या, नातेवाईक आक्रमक, 24 तास उलटूनही आरोपी मोकाट, कुटूंब उतरलं रस्त्यावर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बीड :- “केज तालुक्यातील मस्साजोग येथे सरपंचाचे अपहरण करून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. संतोष देशमुख असे सरपंचाचे नाव असून त्यांचा मृतदेह केज परिसरात आढळून आला.
यानंतर मृताचे नातेवाईक संतप्त झाले असून अहमदनगर -अहमदपूर महामार्गावर (Ahmadnagar Ahmedpur Highway) रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संतोष देशमुख व त्यांचा वाहन चालक हे चारचाकी गाडीतून मस्साजोगकडे जात होते. यावेळी डोणगावजवळ दोन वाहनातून येऊन अज्ञात व्यक्तींनी त्यांची गाडी अडवली. अपहरणकर्त्यांनी सरपंच संतोष देशमुख यांना त्यांच्या कारमधून बाहेर काढल्यानंतर काठीने बेदम मारहाण केली. नंतर अपहरणकर्त्यांनी त्यांना बळजबरीने ते आलेल्या गाडीत बसवून केजच्या दिशेने नेले. याबाबत केज पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तपास सुरु केला होता. मात्र काही तासानंतर बोरगाव-दहीटना रस्त्यावर संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला.
मृताचे नातेवाईक आक्रमक
संतोष देशमुख हे त्यांच्या अनेक चांगल्या कार्यामुळे तालुक्यात परिचित होते. त्यांनी मस्साजोग ग्रामपंचायतला अनेक पुरस्कार मिळवून दिले आहेत. या घटनेमुळे तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आता या प्रकरणी अहमदनगर-अहमदपूर महामार्गावर रास्ता रोको केला जात आहे. मृताचे नातेवाईक संतप्त झाले असून रास्ता रोको करत गुन्हा दाखल झालेल्या आरोपींना अटक करण्याची मागणी केली जातेय. रास्ता रोकोच्या ठिकाणी अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक दाखल झाले असून नातेवाईकांची समजूत काढली जात आहे.
पुण्यात देखील अपहरण अन् हत्या
दरम्यान, पुणे विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे अपहरण झाले होते. आता सतीश वाघ यांचा खून झाल्याचे उघड झाले आहे. यवत गावच्या हद्दीत त्यांचा मृतदेह सापडला आहे. सतीश वाघ हे मॉर्निंग वॉकला गेले होते. घरापासून काही अंतरावर जाताच चार जणांनी त्यांना जबरदस्तीने एका चारचाकी वाहनात डांबले आणि काही समजण्याच्या आतच त्यांचं अपहरण केलं होतं. मांजरा परिसरात ही घटना घडली घडली होती.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….