आमदार संजय राठोड यांच्या मंत्रिपदासाठी अठरापगड जातीसह बंजारा समाज एकवटला ; दिग्रस ते पोहरादेवी प्रार्थना रॅली काढत वेधले लक्ष…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
दिग्रस :- राज्यातील बंजारा समाज एकमुखाने ज्यांच्यासाठी कायम उभा राहिला ते नाव म्हणजे संजय राठोड. एवढेच नव्हे तर देशातील बंजारा समाज देखील, काशी समजल्या जाणाऱ्या श्री. क्षेत्र पोहरागड येथे त्यांनी केलेल्या विकास कार्याचे तोंडभरून कौतुक करतो.
यवतमाळ, वाशिम जिल्ह्यासह दिग्रस, दारव्हा, नेर विधानसभा मतदारसंघातील अठरापगड जातींना सोबत घेऊन त्यांनी विकासाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले आहे, म्हणूनच जनतेने प्रचंड मतांनी आशीर्वाद देत त्यांची पाचव्यांदा आमदार पदी निवड करत लोकसेवेची संधी दिली आहे.
त्यामुळे आज महाराष्ट्रात त्यांच्या कॅबिनेट मंत्रिपदासाठी बंजारा समाजासह विविध समाजाचे लोक धार्मिक ठिकाणी प्रार्थना करत आहे. लोकनेत्याला मंत्रीपदाची संधी मिळालीच पाहिजे असा आग्रह लाखो लोकांचा आहे. याचाच भाग म्हणून त्यांच्यासाठी दिग्रस ते श्री क्षेत्र पोहरागड अशी प्रार्थना रॅली काढण्यात आली आहे. संत श्री सेवालाल महाराज यांना वंदन करून लोकसेवकाला कॅबिनेट मंत्री पद द्यावे अशी प्रार्थना हजारोंच्या संख्येने रॅलीत सहभागी बांधव करणार आहे.
बंजारा समाजाचे धर्मगुरू, संत, महंत देखील त्यांच्या मंत्रीपदासाठी आतुर असून सर्व यासाठी प्रयत्नशील आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….