सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री पदावरून हकालपट्टी ; रणदीपसिंह सुरजेवालाची माहिती
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
विशेष प्रतिनिधी
राजस्थानातील कॉंग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांची आज उपमुख्यमंत्रीपदावरून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती रणदिपसिंह सुरजेवाल यांनी दिली आहे.तसेच पायलट यांच्याकडे जी खाती आहेत ती ही काढून घेण्यात आली आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले
काही वेळापूर्वी पायलट यांची पक्षातून हकालपट्टी करा अशी मागणी राजस्थानातील कॉंग्रेसच्या बहुसंख्य आमदारांनी केली आहे.
मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि पायलट यांच्यात जो सामना रंगला आहे. पायलट दोन दिवस झाले दिल्लीत आहेत पण, ते कोठे आहेत हे समजत नाही. ते नेमके काय करणार आहेत. त्यांनी प्रियंका गांधी किंवा राहुल गांधीशी चर्चा केल्याचे वृत्त होते पण, त्याबाबतही अधिकृत दुजोरा कोणी दिला नाही.
आज राजस्थान विधिमंडळ कॉंग्रेस पक्षाची बैठक जयपूर येथील हॉटेल फेअरमोन्टमध्ये पार पडली. या बैठकीला पक्षाचे 102 आमदार बैठकीत उपस्थित असल्याचा दावा कॉंग्रेसने केला आहे. पक्षविरोधी कारवाया करणारे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी पक्षातून हकालपट्टी करा अशी मागणी या आमदारांनी केली आहे.
कॉंग्रेसच्या नेत्यांनी पायलट यांना पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहण्याची विनंती केली होती मात्र ते आले नाहीत. पायलट यांचे बंड मोडून काढण्याचे शेवटी पक्षाने ठरविले आहे. सुरजेवाल यांनी पायलट यांची उपमुख्यमंत्रीपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे असे जाहीर केले आहे.