हवेतून कोरोना पसरु शकतो ; डब्ल्युएचओने जारी केल्या नव्या गाईडलान्स
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
विशेष प्रतिनिधी
कोरोनाचा संसर्ग हवेद्वारे होतो असा दावा 32 देशातील शास्त्रज्ञांनी केला आहे. त्यावर जागतिक आरोग्य संघटनेनं (डब्ल्युएचओ) कोरोनाचा संसर्ग हवेद्वारे होऊ शकतो, असे मान्य केले असले तरी, यासंदर्भात ठोस पुराव्यांची आवश्यकता आहे, असे त्यांनी नमूद केले आहे. दरम्यान, डब्ल्युएचओने यासंदर्भात काही नवीन सुचना जारी केल्या आहेत. त्यामध्ये काही महत्वाच्या सुचना अशा आहेत, ज्या कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये, यासाठी नक्कीच उपयोगी ठरतात.
काही विशेष स्थान व जागांवरुन कोरोना व्हायरसचा संसर्ग हा हवेतून होतो, असे डब्ल्युएचओने म्हटले आहे. यामध्ये गर्दीच्या ठिकाणांवरुन एरोसोल ट्रांसमिशनसोबतच हॉलमधून, रेस्टॉरंट आणि फिटनेस क्लासेसमध्ये सुद्धा कोरोना व्हायरस हवेतून पसरु शकतो, अशी शक्यता डब्ल्युएचओने वर्तवली आहे.
त्याचबरोबर बंद खोलीत अधिक काळासाठी बाधित व्यक्ती राहिल्यासही कोरोना व्हायरसचा संसर्ग त्या ठिकाणी असलेल्या हवेतून पसरण्याची भीती डब्ल्युएचओने व्यक्त केली आहे. त्यामुळे लोकांनीही अशा ठिकाणी जाणे टाळले पाहिजे. दरम्यान यासंदर्भात डब्ल्युएचओ विविध देशातील शास्त्रज्ञांसोबत चर्चा करत आहे, तसेच हवेतून कोरोना व्हायरसचा संसर्ग आणखी कशा प्रकारे आणि कुठल्या ठिकाणांहून होण्याची शक्यता आहे, यावर अभ्यास करत आहे.
उल्लेखनीय म्हणजे डब्ल्युएचओने यावर आधीच शिक्कामोर्तब केला आहे की, कोरोना व्हायरस बाधित रुग्णांच्या शिंकण्यातून, खोकलल्यातून व बोलत्यावेळी लाळेच्या माध्यमातून इतरांनाही या व्हायरसची लागण होते. तसेच बाधित रुग्णांपासून हाताने हातळलेल्या वस्तूंवर जसे टेबल, खुर्ची, उपकरणास आपण हातळले त्यातूनही कोरोना व्हायरसची लागण होते. त्यामुळे अशा वस्तू सतत सॅनटाईजेशन होणे आवश्यक आहे. त्यामुळे सतत फेस मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे आणि हॅण्ड वॉश करणे आवश्यक आहे.