दिवसभरात 23 नवीन पॉझेटिव्ह तर 13 जणांना डिस्चार्ज
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ:
गुरूवारी दिवसभरात 23 नवीन कोरोना पॉझेटिव्ह रुग्णांची जिल्ह्यात भर पडली. तर आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व सुरवातीला पॉझेटिव्ह आलेले 13 जण उपचारामुळे बरे झाल्यावर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
आज (दि.9) नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 23 जणांमध्ये 10 पुरूष व 13 महिलांचा समावेष आहे. यात पुसद शहरातील उम्मद नगर येथील एक महिला, यवतमाळ शहरातील तायडे नगर येथील एक महिला, दत्तमंदिर वडगाव येथील तीन महिला आणि एक पुरुष, यवतमाळ शहरातीलच आर्णी रोड येथील एक महिला, उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथील एक पुरूष, पुसद येथील तीन पुरूष व दोन महिला, वणी येथील दोन महिला, दारव्हा येथील एक महिला व एक पुरूष आणी यवतमाळ येथील चार पुरुष व दोन महिला पॉझेटिव्ह आल्या आहेत.
आज (दि.9) नव्याने 23 जण पॉझेटिव्ह आल्याने जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 94 झाली आहे. गत 24 तासात वैद्यकीय महाविद्यालयाला 348 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 23 पॉझेटिव्ह आणि 319 रिपोर्ट निगेटिव्ह असून 6 रिपोर्टचे अचूक निदान होणे बाकी आहे. सद्यस्थितीत वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात 115 जण भरती आहे.
जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत पॉझेटिव्ह रुग्णांचा आकडा 379 वर गेला आहे. यापैकी 272 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली तर जिल्ह्यात 13 जणांच्या मृत्युची नोंद आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने आज 34 नमुने तपासणीकरीता प्रयोगशाळेत पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण 6501 नमुने प्रयोगशाळेत पाठवले असून यापैकी 6275 प्राप्त तर 226 रिपोर्ट अप्राप्त आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 5896 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे.