दिवसभरात पुन्हा 11 पॉझेटिव्ह ; नऊ जणांना डिस्चार्ज 24 तासात 134 रिपोर्ट निगेटिव्ह
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :
जिल्ह्यात दिवसभरात पुन्हा 11 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली. तर आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व सुरुवातीला पॉझेटिव्ह आलेले नऊ जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
बुधवारी नव्याने पॉझेटिव्ह आलेले 11 जण दिग्रस येथील असून यात सात महिला व चार पुरुष आहे. त्यामुळे पॉझेटिव्ह रुग्णांचा आकडा 67 वर पोहचला. मात्र नऊ जण ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. त्यामुळे ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 58 वर आली आहे. गत 24 तासात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला 145 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 11 पॉझेटिव्ह तर 134 रिपोर्ट निगेटिव्ह आहे. आयसोलेशन वॉर्डात सद्यस्थितीत 64 जण भरती आहे.
जिल्ह्यात सुरुवातीपासून पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 290 झाली आहे. यापैकी 223 जणांना सुट्टी देण्यात आली आहे. नऊ जणांच्या मृत्यूची नोंद जिल्ह्यात आहे. वैद्यकीय महाविद्यालयाने आज 23 नमूने तपासणीकरीता प्रयोगशाळेत पाठविले. सुरुवातीपासून आतापर्यंत 4950 नमूने पाठविले असून यापैकी 4913 प्राप्त तर 37 अप्राप्त आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण निगेटिव्ह नमून्यांची संख्या 4623 आहे.
०००००