कृषी दिन विषेश शेती मोडली तर देश मोडेल आणि लोकशाहीही मोडेल : वसंतराव नाईक
पॉलिटिक्स पेशल लाईव्ह
हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांनी सात जुलै 1972 रोजी झालेल्या शिबिरात एका भाषणात एक महत्त्वाचा मुद्दा मांडला ते म्हणाले की शेती मोडली तर देश मोडेल तसेच शेती मोडली तर लोकशाही मोडेल.पाठीचा कणा मोडला तर माणूस उभा राहू शकत नाही त्याप्रमाणे शेती व शेतकरी देशाचा कणा आहे तो मोडल्यास देश दुबळा होईल शेती व शेतकऱ्यांच्या बाबतीत 48 वर्षांपूर्वी वसंतरावजी नाईक यांनी व्यक्त केलेली मते आजही योग्य आहेत आणि शेती व शेतकऱ्यांच्या बाबतीत अत्यंत उपयुक्त असे वाक्य नाईक साहेब केवळ बोलून थांबले नाही तर कृतीतून प्रत्यय आणून दिला.
केंद्राच्या शेतीविषयक धोरण शेतकऱ्यांच्या हिताचे नाही हे सांगण्यात त्यांनी मागेपुढे पाहिले नाही विशेषतः शेतीविषयक शिबिरात त्यांनी या मताचा हिरिरीने पुरस्कार केला त्यामुळे मतभेदाच्या दरी निर्माण झाल्या. पुढे 1974 मध्ये त्यांना राजीनामा द्यावा लागला परंतु त्यांनी आपला विचार बदलला नाही. वसंतरावजी नाईक असते तर असा विचार जेव्हा मांडण्यात येतो त्यामुळे तो प्रकर्षाने जाणवते की, शेती व शेतकऱ्यांचे वास्तव जाणारा जमिनी वास्तविकतेचे
भान ठेवणारा नेता असा आता होणे नाही. वसंतरावजी नाईक यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य असे की, राज्यावर संकट आले की त्यांचे नेतृत्व उजळून निघायचे संकटाशी मुकाबला करण्यासाठी सर्वांना एकजूट ठेवण्यात ते माहिर होते. 1971-72 च्या दुष्काळाचा सामना करण्यासाठी रोजगार हमी योजनेची त्यांनी निर्मिती केली ती आजही सर्व देशभर लागू आहे त्यातच नाईक साहेबांची थोरवी जडलेली आहे.
आज आपण पाहतो की.संकटे आले तर एकजुट सोडा पक्षीय राजकारणाला पेव फुटते. म्हणायला आम्ही कोरोना संकटात सरकारच्या बाजून आहोत मात्र सरकारच्या विरोधात दिसतो पण नाईक साहेबांचे काळात दुष्काळाच्या संकटावर मात करण्यासाठी सारा महाराष्ट्र एक होता. दुष्काळग्रस्त अहमदनगर जिल्ह्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर दुष्काळी कामे काढून असंख्य मजुरांना रोजगार दिला त्या वेळेस विरोधी पक्ष नेते बबनराव ढाकणे यांनी रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या मजुरांकडून वर्गणी करून नाईक साहेबांचा पुतळा उभारला.विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांचा पुतळा उभारावा हा राजकारणातील एक दुर्मिळ घटना आहे.वसंतराव नाईक खरोखरच अजातशत्रू होते विरोधी कोनीही असो साहित्यिक, राजकारणी, लेखक असो वसंतराव नाईक यांच्यावर टीका करण्यापूर्वी अनेकदा विचार करत. एक सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ख्याती होती. बाळासाहेब ठाकरे प्र. के. अत्रे नाईक साहेबांना मित्र मानत. नाईक साहेबांच्या कौटुंबिक दुःखातही ते सहभागी होतअसत.
वसंतराव नाईक यांच्या कन्या अरुंधती नाईक यांच्या आकस्मिक निधनानंतर आचार्य अत्र्यांनी मराठा वृत्तपत्रात जो लेख लिहिला तो हृदय हेलावणारा आहे.नाईक साहेबांच्या काळात विशेषतः मुंबई ठाण्याच्या पट्ट्यात अशांतता होती. साम्यवादी विचारसरणीच्या कामगार संघटना वारंवार बंद पुकारत असत त्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मार्मिक प्रहार केले त्यामुळे औद्योगिक अशांतता दूर झाली त्याचा परिणाम असा की, मुंबईमध्ये लक्षावधी लोकांना रोजगार मिळाला. वसंतराव नाईक यांचे गतिमान नेतृत्व त्यामुळे महाराष्ट्रातील सरकार तब्बल एक तपापर्यंत राहिले व महाराष्ट्राचा विकास झाला. महाराष्ट्र देशात नंबर एक राज्य राहिले. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांना पॉलिटिक्स स्पेशल चे विनम्र अभिवादन!