दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन मंजूर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- उत्पादन शुल्क धोरण प्रकरणामध्ये राऊस अव्हेन्यू कोर्टाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्ज मंजूर केला आहे. केजरीवालांना 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मोठा दिलासा मिळाला. जामिनाला विरोध करण्यासाठी ईडीने ४८ तासांचा वेळ मागितला आहे.
शुक्रवारी कोर्टासमोर दोन्ही बाजूंचे युक्तिवाद होतील. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर तिहार तुरुंगातून ते बाहेर येऊ शकतात, असे राऊस अव्हेन्यू कोर्टाने सांगितले.
ट्रायल कोर्टाचे विशेष न्यायाधीश न्याय बिंदू यांच्या कोर्टाने केजरीवालांना जामीन मंजूर केला आहे. या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान देता यावे यासाठी जामीनपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी ४८ तासांचा अवधी द्यावा, अशी विनंती ईडीने ट्रायल कोर्टाला केली होती. परंतु कोर्टाने स्थगिती देणार नसल्याचं म्हटलं आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….
मोदी-शहांचे स्वप्न पूर्णत्वाकडे..! बंगालमध्ये भाजपने पार केला बहुमताचा आकडा; २ दशकांनंतर सत्तांतर, ममतांना मोठा धक्का….