अजित पवारांचं दमदाटी भाषण अन् शरद पवारांवर केला हल्लाबोल ; म्हणाले , बारामतीकरांनी करेक्ट कार्यक्रम केलं….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार यांनी गाव दौरे सुरु केले असून बारामती तालुक्यातील गावांकडे विशेष लक्ष असल्याच पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी बारामतीमधील व्यापाऱ्यांच्या मेळाव्याला शरद पवार उपस्थित होते.
यावेळी बारामतीच्या विकासासाठी वेळ पडल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही भेट घ्यायला मागेपुढे पाहणार नाही, असे शरद पवार यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर गाव दौऱ्यावर असताना त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी अजित पवार याचं नाव न घेता थेट हल्लाबोल केला.
शरद पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीत वडगाव निंबाळकर या गावातील जनता आपल्या पाठिशी राहिली. गेल्या 57 वर्षांपासून आपण सर्वजण माझ्या पाठिशी आहात असं म्हणत अजित पवारांनी निवडणूक काळात केलेल्या दमदाटीच्या भाषणावर थेट हल्लाबोल केला. गेले काही वर्ष या भागाचे प्रश्न असतील ते दुसऱ्यावर टाकले होते, आणि मी राज्य आणि देश पातळीवर काम करण्यासाठी वेळ घालवला.
मात्र, यावेळी एक वेगळी स्थिती निर्माण झाली. आज इकडे दहा ते पंधरा लोक असे दिसत आहेत की, जे 56 वर्षांपूर्वी साथ देणारे आजही इथच आहेत. इथं अनेकजण माझ्यासोबत काम करत होते. या भागात येताना काळजी घ्यावी लागत असे, पण मी गेले 56 वर्ष निवडणूक लढलो आणि जिंकलो. पहिली निवडणूक सोपी नव्हती, कष्ट घ्यावे लागले, हा भाग नंतर तुम्ही सांभाळला, मी राज्यात फिरत होतो. नंतर तीन वेळेला लोकसभेला सुप्रिया सुळे यांना तुम्ही निवडून दिले, तर देशाच्या लोकशाहीत मलाही निवडून दिले.
बारामतीकरांनी न बोलता करेक्ट कार्यक्रम केला
यंदाची लोकसभा निवडणूक सोपी नव्हती, देशात आणि जगभर देशभर गेली. अनेकांना चिंता होती काय होईल कसं होईल, सत्ता हातात नाही, राज्याची सत्ता नाही. त्यातच, काही लोकांना फोन येऊ लागले, प्रेमाने, दमदाटीही केली, जे माहिती नव्हतं ते या निवडणुकीत पाहिला मिळालं. मात्र, या निवडणुकीत लोक पुढे येतच नव्हते, न बोलणारी ही निवडणूक होती. ज्या गावात लोक पुढे येत नव्हते, तिकडे मतदान झालं. लोक बोलत नव्हते पण त्यांना सागवा लागलं नाही आणि लोकांनी तुतारी दिल्लीला पाठवली, असे म्हणत बारामतीकरांनी न बोलता करेक्ट कार्यक्रम केल्याचं शरद पवार म्हणाले.
मोदींनी प्रत्येक सभेत माझं नाव घेतलं हे माझे भाग्य : शरद पवार
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, मोदींनी राज्यभर 16 सभा घेतल्या, प्रत्येक ठिकाणी माझं नाव घेतलं हे माझे भाग्य समजतो. मात्र, लोकसभा निवडणुकीत आम्ही 48 जागा लढलो आणि 31 जिंकलो, राष्ट्रवादीचे 10 पैकी 8 ठिकाणचे उमेदवार विक्रमी मतांनी जिंकून दिले. पंतप्रधान असो, मुख्यमंत्री असो, इतर कोणीही असो, दमदाटी करणाऱ्याची नोंद मतदारांनी घेतली नाही, त्यांनी आपलं मतदान योग्य ठिकाणी केले, असे म्हणत शरद पवारांनी अजित पवारांवर नाव न घेता जोरदार निशाणा साधला.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..