आता जीव गेला तरी माघार नाही…!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
जालना :- मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारलाय. सरकारने परवानगी दिली किंवा नाही तरी 8 जूनपासून आंदोलन करण्यावर जरांगे पाटील ठाम आहेत.
प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतर मनोज जरांगे यांनी सरकारला थेट इशाराच दिलाय. गोळ्या घाला की जेलमध्ये टाका मी समाजासाठी मरायला तयार आहे आता माघार नाही असा निर्वाणीचा इशारा मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिलाय. तर उपोषणाला गावकऱ्यांनी केलेला विरोध हे सरकारचं षडयंत्र असल्याचा आरोपही जरांगे पाटील यांनी केलाय.
पोलिसांनी परवानगी नाकारली
मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारलीय. कारण उपोषणाचा त्रास होत असल्यानं, वडीगोद्री आणि दोदडगाव येथील नागरिकांनी जरांगेंच्या उपोषणाला परवानगी न देण्याची मागणी अंबड तहसीलदारांकडे केली होती..
दरम्यान, अंतरवाली सराटीमध्ये 2023 पासून सुरू झालेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला. एक नजर टाकुया अंतरवालीमधील मराठा आंदोलनाच्या आतापर्यंतच्या घडामोडींवर
जरांगेंच्या आंदोलनाचा प्रवास
– 29 ऑगस्ट 2023 – आंदोलनाला सुरूवात
– 1 सप्टें. 2023 – पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज
– 14 सप्टें. 2023 मुख्यमंत्री शिंदेंनी उपोषण सोडवलं
– 14 ऑक्टो.2023 ला जरांगे पाटील यांनी सभा घेत सरकारला आश्वासनाची आठवण करून दिली
– 25 ऑक्टो.2023 ला जरांगेंनी पुन्हा उपोषण सुरू केलं
– 2 नोव्हें. 2023 – 8 दिवसांनंतर उपोषण सुटलं
– 20 जाने. 2024 – जरांगे यांच्यासह लाखो मराठा आंदोलक मुंबईकडे निघाले. सरकारकडून पुन्हा आश्वासन मिळालं, त्यावेळी गुलाल उधळत जरांगे माघारी फिरले
लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना जरांगे इफेक्टचा फटका बसल्याचं पाहायला मिळालं. त्यात जरांगे पाटील 8 जूनपासून उपोषणावर ठाम आहेत. प्रशासनाने परवानगी नाकारली असली तरी जरांगेंच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करणं सरकारला परवडणारं नाहीय. त्यामुळे सरकार यातून कसा मार्ग काढतं हे पाहणंही महत्वाचं आहे..

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..