तर नवनीत राणा जिंकल्या असत्या…. ; बच्चू कडू यांनी लगावला टोला….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमरावती :- अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाला आहे. नवनीत राणा यांचा पराभव व्हावा यासाठी प्रहार जनशक्तीचे प्रमुख बच्चू कडू यांनी प्रयत्न केले होते.
आता राणा यांच्या पराभवानंतर कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रवी राणा गप्प राहिले असते तर नवनीत राणा जिंकल्या असत्या, असा टोला त्यांनी लगावला आहे.
बच्चू कडू म्हणाले की, ‘अर्ज भरायला जात असताना सोयीचा निकाल लागला, अगदी जसा पाहिजे तसा निकाल देण्यात आला. लोकांना हे आवडलं नाही. आमचं मैदान असताना त्यांनी ते घेतलं. आम्ही तेव्हाच सांगितलं होतं, निवडणुकीचे मैदान आम्ही जिंकू. एकंदरीत. या सर्व घटनांमुळे नवनीत राणा न्यायालयात जिंकल्या पण, जनतेच्या कोर्टात त्या हरल्या आहेत.’
काही जण आपापलं कर्तृत्व निर्माण करत असतात. रवी राणा जरी गप्प राहिले असते तरी कदाचित नवनीत राणा जिंकल्या असत्या असा टोला बच्चू कडू यांनी लगावला आहे.
राज्यात अमरावती लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. याठिकाणी भाजपच्या नवनीत राणा यांच्यासमोर काँग्रेसचे उमेदवार बलवंत वानखेडे यांचे आव्हान होते. वानखेडे यांनी १९७३१ मतं अधिक घेऊन राणा यांचा पराभव केला आहे. राणा या २०१९ मध्ये अपक्ष म्हणून खासदार झाल्या होत्या. पण, २०२४ मध्ये भाजपची ताकद पाठीशी असून देखील राणा यांना धक्कादायकरीत्या पराभव सहन करावा लागला आहे.
काँग्रेसकडून लढताना वानखेडे यांना ५२६२७१ मत मिळाली आहेत. तर नवनीत राणा यांना ५०६५४० जागा मिळाल्या. दरम्यान, बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांना हरवण्यासाठी एक उमेदवार उभा केला होता. या उमेदवाराने ७९४४५ घेतली. त्यामुळे देखील राणा यांना धक्का बसला असल्याचं बोललं जात आहे. कडू यांनी राणा यांचा पराभव करणारच असा निर्धार केला होता.

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….
मोदी-शहांचे स्वप्न पूर्णत्वाकडे..! बंगालमध्ये भाजपने पार केला बहुमताचा आकडा; २ दशकांनंतर सत्तांतर, ममतांना मोठा धक्का….