युसुफ पठाणचा लोकसभा निवडणुकीत मोठा विजय ; 5 वेळा खासदार राहिलेल्या उमेदवारांला दिला धक्का….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बहरामपूर :- टीम इंडियाचा माजी क्रिकेटर युसूफ पठाण याला क्रिकेट पाठोपाठ आता लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात सुद्धा मोठं यश मिळालं आहे. तृणमूल कांग्रेसच्या तिकिटावर पश्चिम बंगालच्या बहरामपुर येथून युसूफ पठाणने निवडणूक लढवली होती.
यात त्याने जवळपास 78381 मतांची आघाडी घेत विजय मिळवला आहे. यासह पठाणने तब्बल पाचवेळा खासदार राहिलेल्या अधीर रंजन चौधरी यांचा पराभव केला आहे.
माजी क्रिकेटर युसूफ पठाण पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसकडून त्याला निवडणुकीचं तिकीट मिळालं. पठाण प्रथमच निवडणूक लढवत असला तरी निवडणुकीच्या पीचवर सुरुवातीपासूनच चांगल्या स्ट्राईक रेटने पुढे जात होता. त्याने बहरामपुर येथून काँग्रेसचे विद्यमान खासदार अधीर रंजन चौधरी आणि भारतीय जनता पार्टीच्या डॉ. निर्मल कुमार शाह यांना चांगली टफ दिली.
माजी खासदार अधीर रंजन चौधरी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल कांग्रेसच्या अपूर्वा सरकार यांना 80,696 मतांच्या फरकाने पराभूत केले होते. अधीर रंजन चौधरी बहरामपुरमधून तब्बल 5 वेळा खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेले. 1999 मध्ये ते पहिल्यांदा इथून निवडून आले होते. मात्र पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या युसूफ पठाण याने त्यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीत चांगलाच धक्का दिल्याचे पाहायला मिळतोय.
युसूफ पठाण याला लोकसभा निवडणुकीत जवळपास 4 लाख 87 हजार 753 मतं मिळाली आहेत. तर त्याने तर अधीर रंजन चौधरी यांना जवळपास 4 लाख 11 हजार 699 मतं मिळाली. तर भाजपसह उमेदवार डॉ. निर्मल कुमार शाह यांना जवळपास 3 लाख 56 हजार 878 मतं मिळाली. युसूफ पठाणने सुमारे 78 हजार 381 मतांच्या आघाडीने विजय मिळवला आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….