“नितीश सबके है” ; शरद पवारांची नितीश कुमार यांना साद , उपपंतप्रधान पद घेत “इंडिया” मध्ये येणार का…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी सुरूवात झाली असून, यामध्ये एनडी आणि इंडिया आघाडीमध्ये जोरदार चुरस आहे. दोन्ही आघाड्या बहुमताच्या जवळ असून, काही जागा पडल्यास खासदारांची जुळवाजुळव सुरू झाली आहे.
दरम्यान बिहारमध्ये 15-17 जागांवर आघाडीवर असलेल्या मुख्यमंत्री नीतीश कुमार यांना शरद पवार यांनी फोन करत इंडिया आघाडीत येण्यासाठी साद घातली आहे. दरम्यान नीतीश कुमार इंडिया आघाडी आल्यास त्यांना उपपंतप्रधान पद देण्याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान 543 जागांसाठी सुरू असलेल्या मतमोजणीत भाजपच्या नेतृत्त्वाखालील एनडीए 285 जागांवर पुढे आहे. तर इंडिया आघाडी 235 जागांवर पुढे आहे. जर एनडीएच्या जाग आणखी कमी झाल्या तर एनडीए मधील काही पक्षांना सोबत घेत इंडिया आघाडी सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे.
दरम्यान माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांना फोन करत इंडिया आघाडीत येण्याची साद घातली आहे. त्याचबरोबर नीतीश इंडिया आघाडीत आले तर त्यांना उपपंतप्रधान पद मिळण्याची शक्यता आहे. अशी चर्चाही सर्वत्र सुरू झाली आहे.
दुसरीकडे महाराष्ट्रातही महाविकास आघाडीने दमदार कामगिरी करत महायुतीला जेरीस आणले आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी आपली ताकद पणाला लावत 30 जागांवर आघाडी मिळवली आहे. तर महायुती 17 जागांवर आघाडीवर आहे.
महाराष्ट्रातील या कलांवरून हे लक्षात येते की, जनतेला फोडाफोडीचे राजकारण पटलेले नाही.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….